औरंगाबाद -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा सुरु आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेसाठी शिवसेनेने ताकद लावली आहे. या सभेत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसेवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्र कुणाचा हे सांगणारी ही सभा आहे. काहींनी याच मैदानात सभा घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पण, मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, असा निशाणा राऊतांनी मनसेवर साधला ( sanjay raut criticized mns ) आहे.
संजय राऊत म्हणाले की, औरंगाबादमधील जनसमुदायाच्या लाटांचा फटका भाजपाला बसला तर पाणी मागायला देखील उठणार नाही. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी उठलेली जनतेची ही लाट दिल्लीला देखील झटका देईल. महाराष्ट्र कुणाचा हे सांगणारी ही सभा आहे. काहींनी याच मैदानात सभा घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पण, मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.