युतीचे सरकार असताना शहराचे नाव का बदलले नाही - चंद्रकांत खैरे
शहराचे नाव बदलून संभाजीनगर करा असे अनेक पत्र दिले आहेत. राज्यात युती सरकार होत त्यावेळी भेट झाली, त्यावेळी स्मरण करून देत होतो. मात्र, त्यावेळी फक्त हसत होतात. का नाव बदललं नाही. विमानतळाचे नाव बदलण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र दिले. आम्ही स्वतः जाऊन भेटलो. मग का नाव बदलत नाहीत. केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तुम्ही केले नाहीत. भाजपचे सर्वच लोक खोट बोलतात, अशी टिका खैरे यांनी केली.
औरंगाबाद -युती सरकार असताना शहराचे नाव का संभाजीनगर केले नाही? असा संतप्त प्रश्न शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेमुळे खैरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
फडणवीस यांनी केली टिका -भाजप नेते आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी घेतलेल्या सभेत संभाजीनगरच्या मुद्द्यावरून सेनेवर टिका केली. खैरे व्हा बहिरे, भाजप सत्तेत येई पर्यंत संभाजीनगर विसरा अशी टिका फडणवीस यांनी केली होती. त्यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे संतप्त झाले असून त्यांनी फडणवीस यांच्यावर टिका केली.
विमानतळाचे नाव का बदलले नाही -शहराचे नाव बदलून संभाजीनगर करा असे अनेक पत्र दिले आहेत. राज्यात युती सरकार होत त्यावेळी भेट झाली, त्यावेळी स्मरण करून देत होतो. मात्र, त्यावेळी फक्त हसत होतात. का नाव बदललं नाही. विमानतळाचे नाव बदलण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र दिले. आम्ही स्वतः जाऊन भेटलो. मग का नाव बदलत नाहीत. केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तुम्ही केले नाहीत. भाजपचे सर्वच लोक खोट बोलतात, अशी टिका खैरे यांनी केली.