महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MLA Shirsath Meets CM Shinde with Many Supporters : बंडखोर आमदार संजय शिरसाट हजारो समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला - Zilla Parishad members

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप-शिंदे गटाचे सरकार ( BJP-Shinde Group Government ) प्रस्थापित झाल्यानंतर शिंदे गटाचे अनेक आमदार समर्थकांसह एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत. आता शिवसेना बंडखोर आमदार संजय शिरसाट ( Rebel MLA Shirsath with Supporters in Mumbai ) यांनी आपल्या हजारो कार्यकर्ते, समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट ( CM Eknath Shinde visit ) घेतली. यामध्ये माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य ( Zilla Parishad members ), पंचायत समिती सदस्य यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

MLA Sanjay Shirsath in Mumbai with supporters
आमदार संजय शिरसाठ समर्थकांसह मुंबईत

By

Published : Jul 14, 2022, 1:19 PM IST

Updated : Jul 14, 2022, 2:02 PM IST

औरंगाबाद : ( BJP-Shinde Group Government ) शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना ( Shiv Sena workers Aurangabad to Mumbai )झाले आहेत. शिवसेना बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचे समर्थक ( Rebel MLA Shirsath with Supporters in Mumbai ) असून, यामध्ये माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ( Panchayat Samiti members ) यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या निमित्ताने जिल्ह्यात सेनेच्या भक्कम किल्ल्याला तडा जाण्यास सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळाले. ( CM Eknath Shinde visit ) ( Zilla Parishad, Panchayat Samiti members visit with MLA Shirsath )

MLA Sanjay Shirsath in Mumbai with supporters

आमदार शिरसाट यांचे शक्ती प्रदर्शन : एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने आमदार संजय शिरसाट यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. स्थानिक नेत्यांनी त्यांच्यावर टीका करीत अकार्यक्षम आमदार म्हणून त्यांचा उल्लेख केला. मात्र, आमदार संजय शिरसाट शहरात दाखल झाल्यावर त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने शिरसाट यांच्या पश्चिम मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून आपली मूठ बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार शिरसाट समर्थकांनी एकत्र येत मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. ( MLA Shirsat supporters came to reach Mumbai ) आणि गुरुवारी सकाळी जवळपास 30 ते 35 गाड्यांमध्ये कार्यकर्त्यानी शक्ती प्रदर्शन करीत मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण केलं.


हे शक्ती प्रदर्शन नाही :औरंगाबाद शहरातून पाच हजार शिवसैनिक मुंबईला जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर नाशिक, जालना, यांच्यासह इतर जिल्ह्यातून कार्यकर्ते येणार असल्याचे आमदार शिरसाट यांच्या पत्नी विजया शिरसाट यांनी सांगितले. हे शक्ती प्रदर्शन नाही, तर हिंदुत्वाच्या विचाराला पाठिंबा आहे. सेनेच्या पन्नास आमदारांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याने हे कार्यकर्ते सोबत आले असून, याला शक्ती प्रदर्शन म्हणता येणार नाही. एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार शिवसैनिकच आहेत. असे मत नगरसेवक आणि आमदार शिरसाट पुत्र सिद्धांत यांनी सांगितले. आम्ही निवडणूक लढवताना युतीच्या माध्यमातून मत मागितले. आता जर भाजपसोबत राहिलो नाही तर पक्षाला मोठे नुकसान होईल म्हणून आम्ही आमदार शिरसाट यांच्या भूमिकेला साथ दित आहोत, अशी भावना माजी नगरसेवकांनी व्यक्त केली.

बंडखोर आमदारांचे शक्तिप्रदर्शनासह मुख्यमंत्र्यांची भेट :महाराष्ट्रात सत्ता स्थापनेनंतर शिंदे गटाचे अनेक आमदार आपआपले शक्तिप्रदर्शन करीत समर्थकांसह मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. आताच काही दिवसांपूर्वी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झाले. सह्याद्री येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत एकनाथ शिंदेंना पाठिंबा दर्शवला.

मुख्यमंंत्री एकनाथ शिंदेंकडून बांगरांचे पुनर्वसन : मुख्यमंत्री एकनाथशिंदे ( CM Eknath Shinde ) गटातील बंडखोर आमदार संतोष बांगर ( MLA Santosh Bangar ) यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) हाकलपट्टी केली. दुसऱ्या दिवशी बांगर यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहाबाहेर समर्थकांसह शक्ती प्रदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांगरच जिल्हाप्रमुख असल्याचे यावेळी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी काढल्यानंतर शिंदे यांनी पुनर्वसन केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. बंडखोर आमदार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री आमदारांना देत आहेत विश्वास -मविआचे सरकार असताना अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढील निवडणुकीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. हिंदुत्व, सावरकर, किंवा दाऊदचा विषय असो आपल्याला उघडपणे बोलता येत नव्हते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला. बाळासाहेबांनी अन्यायाला वाचा फोडा सांगितले होते. त्यामुळे हा उठाव केला आहे. तो बंड नसून अन्यायाविरोधातील उठाव आहे. ही भूमिका साधी नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच संतोष बांगर यांना तूच जिल्हाप्रमुख म्हणून तू कायम आहेस. इतकी ताकद मागे असताना इतर दुसरे कोण तिथे काम करु शकते, असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :Maharashtra and India Rain live : देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस ! गुजरात आणि महाराष्ट्रात रेड अलर्ट, पाहा पावसाची स्थिती

हेही वाचा :Maharashtra Rain Update : राज्यात जोरदार पावसाचा इशारा, आज 'या' ठिकाणी रेड अलर्ट

हेही वाचा :Maharashtra Live Breaking News : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद, मंत्रिमंडळातील निर्णय करणार जाहीर

Last Updated : Jul 14, 2022, 2:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details