औरंगाबाद - औरंगाबाद् आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय आज महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय याआधीच महाविकास आघाडीने घेतला असल्याचे सांगत शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने (ठाकरे गट) औरंगाबादमध्ये आंदोलन केले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण राज्य सरकारने आज जाहीर केले आहे. महाविकास आघा़डी सरकारने यापूर्वी घेतलेला निर्णय बेकायदेशीर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.
Renaming : शिंदे सरकारच्या नामांतरण निर्णयाविरोधात शिवसेनेचे औरंगाबादेत आंदोलन - औरंगाबाद नामांतरण निर्णय
औरंगाबाद् आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय आज महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय याआधीच महाविकास आघाडीने घेतला असल्याचे सांगत शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने (ठाकरे गट) औरंगाबादमध्ये आंदोलन केले आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय महाविकास आघाडीने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतला होता. तो निर्णय शिंदे सरकारने रद्द केला आणि चर्चा सुरू झाल्या मात्र. आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत शहराच्या नामांतराचा निरर्णय पुन्हा घेण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबादचे नाव आता छत्रपती संभाजीनगर, आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.