महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबादमध्ये शिवसेनेचे आक्रमक आंदोलन, किरीट सोमैयांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी - agitation against Kirit Somaiya aurangabad

आयएनएस विक्रांतच्या दुरुस्तीसाठी भाजप नेते किरीट सोमैया यांनी सर्व सामान्य जनतेकडून पैसे उकळले, असा आरोप करत शिवसेनेने क्रांती चौकात जोरदार आंदोलन केले. किरीट सोमैया यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत सोमैया यांच्या फोटोला जोडे मारून शिवसैनिकांनी ( Agitation against Kirit Somaiya by shivsena aurangabad) रोष व्यक्त केला.

Shiv Sena aggressive agitation in Aurangabad
किरीट सोमैया विरोध शिवसेना औरंगाबाद

By

Published : Apr 7, 2022, 1:37 PM IST

औरंगाबाद - आयएनएस विक्रांतच्या दुरुस्तीसाठी भाजप नेते किरीट सोमैया यांनी 58 कोटी रुपये सर्व सामान्य जनतेकडून उकळले, असा आरोप करत शिवसेनेने क्रांती चौकात जोरदार आंदोलन केले. किरीट सोमैया यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत सोमैया यांच्या फोटोला जोडे मारून शिवसैनिकांनी ( Agitation against Kirit Somaiya by shivsena aurangabad) रोष व्यक्त केला. सोमैया यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही तर जनआंदोलन उभारू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

माहिती देताना शिवसेनेचे पदाधिकारी

हेही वाचा -Blood Supply '104' Service Closed : रक्त पुरवणारी '104'सेवा बंद! काय परिणाम होणार?, पहा ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट

काय आहे प्रकरण? : महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर किरीट सोमैयांकडून सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमैयांनी आयएनएस विक्रांतचे संग्रहालय करण्यासाठी सर्व सामान्यांकडून जमवलेला कोट्यवधींचा निधी राज्यपालांना दिलाच नसल्याचे प्रकरण उघडकीस आणले आहे. सोमैयांचा नवा घोटाळा असून देशासोबत प्रतारणा केल्याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर माजी सैनिक बबन भोसले यांनी रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली. पोलिसांनी सोमैया पिता-पुत्रांवर कलम 420, 406 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, सोमैया पिता - पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका: भाजपचे महात्मा किरीट सोमैया, त्यांचे महापुत्र नील सोमैया यांचे देशद्रोहाचे घोटाळे मी बाहेर काढले आहेत. (Sanjay Raut on Fadnavis) परंतु, मला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आश्चर्य वाटते. राष्ट्रभक्तीची गाणी म्हणतात, दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती शिकवतात. मात्र, काल फडणवीस यांनी सोमैया यांच्यासारख्या देशद्रोही माणसाची बाजू घेतली. हे पाहून स्वर्गात, गोळवलकर गुरूजी, बाळासाहेब देवरस, डॉक्टर हेडगेवार आणि आजचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा जीव तीळ-तीळ तुटला असेल, अशी प्रतिक्रिया देत, सोमैयांची पाठराखन केल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

हेही वाचा -Aurangabad Crime News : तरुणीच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाइल; आसाराम बापूच्या आश्रामातील आचाऱ्याला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details