महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कर्जमाफीची शिवसेनकडून जाहिरातबाजी, औरंगाबादेत लागले पोस्टर्स - News about Shiv Sena loan waiver

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. यानंतर औरंगाबादमध्ये शिवसेनेने बॅनरबाजी केली आहे. या बॅनरबाजीवर भाजपने जोरदार टीका केली आहे.

shiv-sena-advertises-loan-waiver-in-aurangabad
कर्जमाफीची शिवसेनकडून जाहिरातबाजी

By

Published : Dec 25, 2019, 4:37 PM IST

औरंगाबाद - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर औरंगाबादेत शिवसेनेने बॅनरबाजी केल्याचे दिसून आले. शहरात कर्जमाफी केल्याचे मोठमोठे फलक लावण्यात आले असून या बॅनरबाजीवर भाजपने टीका केली आहे.

कर्जमाफीची शिवसेनकडून जाहिरातबाजी

शिवसेनेने जाहिरातबाजी केल्याचे पाहून ही स्टंटबाजी असल्याचा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड यांनी केला. सातबारा कोरा करण्याचे वचन शिवसेनेने दिल होत त्याच काय झाले, त्याचबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत देणार होता त्याच काय झालं असे प्रश्न भाजपने उपस्थित केला.

औरंगाबादेत सध्या शिवसेनेने लावलेल्या बॅनरची चर्चा सुरू असलेली पहायला मिळाली. सरकारने शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. त्या कर्जमाफीबद्दल शिवसेनेने औरंगाबाद शहरात फलक झळकवत कर्जमाफी करून दाखवली असे लिहिले आहे, त्यावर भाजपने जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांसाठी फक्त कर्जमाफी जाहीर केली आहे. ती अद्याप मिळालेली नाही, त्यामुळे शिवसेना स्टंटबाजी करत असल्याचा आरोप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केला आहे. शिवसेनेने आता फक्त दोन लाखांचीच कर्जमाफी जाहीर केली आहे. सातबारा कोरा करू अशी आश्वासन शेतकऱ्यांना दिली होती त्याचे काय झाले असा प्रश्न उपस्थित करत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत देण्याची भाषा शिवसेना आणि मित्र पक्षांनी केली होती. त्याचे काय? असे प्रश्न भाजपने उपस्थित करत शिवसेनेच्या जाहिरातबाजीवर टीका केली आहे. शिवसेनेच्या पोस्टरबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.

ABOUT THE AUTHOR

...view details