महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sharad Pawar : वसंतरावं नाईक यांच्यामुळे मला आमदारकी लढवता आली - शरद पवार

वसंतराव नाईक, यशवंतरावं चव्हाण ( Yashwantrao Chavan ) यांच्यामुळे मला पहिल्यांदा निवडणूक लढवता आली. माझ्या अंतरमनात त्यांच वेगळं स्थान आहे. अस मत राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी व्यक्त केल. वसंतरावं नाईक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार उपस्थितीत होते.

Sharad Pawar
शरद पवार

By

Published : Jul 11, 2022, 6:22 PM IST

औरंगाबाद -मला तिकीट देऊ नका अस म्हणत होते पण, पन्नास वर्षांपूर्वी मी आमदार व्हाव अशी त्यांनी व्यक्त केली होती. त्यावेळी आमच्या जिल्ह्यातील नेत्यांनी मला विरोध केला. अवघ्या 26 वर्षाच्या मुलाला उमेदवारी कशाला असे म्हणले गेल. मात्र, वसंतरावं नाईक ( Vasantrao Naik ) यांनी काही प्रश्न विचारले. त्यात, आपण किती जागा जिंकू अस विचारलं. त्यावर आपण 98 जागा हरू असे मी सांगितल. इतक्या जागा पडणार आहेत त्यात आणखी एक जागा पडेल काय फरक पडतो अस म्हणत मला उमेदवारी देण्यात आली होती. असा अनुभव शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी सांगितला.

शरद पवारांते भाषण

हेही वाचा -Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे पोलीस आयुक्तांना निर्देश

नाईक यांनी दिली युवकांना संधी -वसंतराव नाईक ( Vasantrao Naik ) शेतीक्षत्रात अमूलाग्र बदल करणारे मुख्यमंत्री म्हणून प्रचलित होते. त्याच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. दुसऱ्यांदा निवडणूक जिंकलो. त्यावेळी त्यांच्याकडे असणाऱ्या खात्यांचा राज्यमंत्री मला करण्यात आल. मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. ते जिम्मेदारी द्यायचे आणि जबाबदारीने काम सांगायचे. राज्यमंत्री असलो तरी त्या खात्यांचं 90 टक्के काम त्यांनी माझ्यावर सोपवलं होत. तरुणांना चालना देण्याचं काम यावेळी त्यांनी केल. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत अनेक वर्ष काढली अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.

दरम्यान,अखेरच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव असं करण्यात आलं. तर, नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आलं. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत हात झटकले आहेत. नामांतर हा किमान कार्यक्रमाचा भाग नव्हता. हा शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकार कक्षेत निर्णय होता. याची कल्पना नव्हती, असे स्पष्टीकरण पवार यांनी दिलं ( Sharad Pawar React On Aurangabad Renaming ) आहे.

"नामांतर ऐवजी नागरिकांच्या हिताचा..." - शरद पवार औैरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. पवार म्हणाले की, नामांतर हा किमान कार्यक्रमाचा भाग नव्हता. हा शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकार कक्षेत निर्णय होता. याची कल्पना नव्हती. शासकीय धोरणाबाबत चर्चा होत होती. नामांतर ऐवजी नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला असता तर आनंद झाला असता, असेही पवार यांनी म्हटलं.

"आमचा काळातील बंड एक दिवसाचा" - काही तरी प्रेम प्रकरण सुरु होत आम्हाला उशिरा कळालं. कर्नाटकमध्ये काय झालं, महाराष्ट्रात काय झालं, गोव्यात काय होऊ लागलं, लोकशाहीच्या संस्था उध्वस्त करण्याचे काम होत आहे. गोवा इतक जवळ आहे, इतका उशीर कसा झाला माहिती नाही. आमच्या काळातील बंड एक दिवसाचा होता, सहा जणांनी राजीनामे दिले, आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. आज सुरत, गोहाटी, गोवा असं होतंय, असा टोलाही पवार यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे.

"महाविकास आघाडीबाबत मित्र पक्षांसोबत..." -एक गोष्ट खरी आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांनी अनेक बैठका घेतल्या, निर्णय घेतले फक्त त्याचा गाजबाजा केला नाही. शिवसेना कोणाची हे न्यायालय ठरवेल. हे सरकार पाडण्याचं लक्ष नाही, त्यापेक्षा सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवणे, पक्षाला बळकटी देणे आणि आगामी निवडणुकीत सर्वसामान्यांना उत्तर देण्यासाठी तयार राहायचं, अशी आमची भूमिका आहे. मध्यवती निवडणूक घेण्याची मागणी शिवसेनेची आहे. तसं झाल तर कळेल की गेलेल्या आमदारांचा निर्णय राज्याच्या भल्याचा होता की स्व:भल्याचा हे समोर येईल. पुढील निवडणुकीत पूर्ण शक्तीने लढणार आहोत. महाविकास आघाडीबाबत मित्र पक्षांसोबत बोलण नाही, मात्र यावर सर्वांनी विचार करायला पाहिजे. एकनाथ शिंदे म्हणतात 200 आमदार निवडूण आणणार त्यांच्या बोलण्यात काही तरी चुकले आहेत. महाराष्ट्रात 288 आमदार आहेत, तर सत्ता नव्हती तर काही लोक अस्वस्थ होते. आता त्यांची अस्वस्थता कमी झाली असेल, असा टोमणा शरद पवारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लगावला आहे.

"सर्वसामान्यांना महागाईत लोटण्याचा प्रयत्न" - श्रीलंकेच्या परिस्थितीबाबत शरद पवार यांनी पहिल्यांदाच आपलं मत व्यक्त केलं. पवार म्हणाले, श्रीलंकेच्या बाबतीत माझ्या मनात शंका आहे. त्यात राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री एकाच कुटुंबातील होते. सत्ता अधिक लोकांत असावी, मात्र तिथे केंद्रित झाली होती. त्याची प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात आली असावी, काळजी करण्याची गरज आहे. कारण ते आपले शेजारी आहेत. सत्ता केंद्रित झाल्यावर काय होत हे यामुळे दिसलं, असे त्यांनी सांगितलं. तसेच, केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर 5% टक्के जीएसटीचा लावण्याचा निर्णय कोणालाही विचारात न घेता घेतला गेला. सर्वसामान्यांना महागाईत लोटण्याचा प्रयत्न आहे. अधिवेशनात आम्ही याबाबत जाब विचारू, असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -Maharashtra Political Crisis : याचिकांवरील सुनावणीसाठी स्वतंत्र घटनापीठ; बंडखोरांवर तुर्त कारवाई नाही

ABOUT THE AUTHOR

...view details