औरंंगाबाद - मुकुंदवाडी परिसरातील मुकुंदनगर येथे राहणार्या आजीकडे राहण्यासाठी आलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय तरुणाने अत्याचार केला. पीडित मुलीस गर्भधारणा झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोव्हेंबर २०२० ते २२ फेब्रुवारी २०२२ दरम्यान तिचे लैंगिक शोषण
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, लक्ष्मण उर्फ अक्षय गोविंद दराडे (वय २१,रा. मुकुंदनगर, रेल्वेपटरीजवळ) असे आरोपीचे नाव आहे. गारखेडा परिसरातील विजयनगरात राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी मुकुंदनगरात राहणार्या आपल्या आजीकडे नोव्हेंबर २०२० मध्ये गेली होती. त्यावेळी तिची ओळख लक्ष्मण उर्फ अक्षय दराडे याच्यासोबत झाली होती. (Sexual abuse of a minor girl Aurangabad Didtrict) लक्ष्मण उर्फ अक्षय दराडे याने पीडितेस लग्नाचे आमिष दाखवून नोव्हेंबर २०२० ते २२ फेब्रुवारी २०२२ दरम्यान तिचे लैंगिक शोषण केले. दरम्यान, पीडित मुलीस गर्भधारणा झाली असून ती सध्या आठ महिन्याची गर्भवती आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून लक्ष्मण उर्फ अक्षय दराडे याच्याविरूध्द मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.