औरंगाबाद - शिक्षकानेच सातवीच्या विद्यार्थिनीला पॉर्न व्हिडिओ दाखवल्याचा धक्कादायक प्रकार सिडको परिसरातील एका शाळेत तीन आठवड्यांपूर्वी घडला होता. त्या मुलीने याची माहिती पालकांना सांगितल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिक्षकाविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. नागनाथ कोडे, सहायक पोलीस आयुक्त हेही वाचा -हिंगणघाट 'छपाक': '...तर महिलांवर होणारे हल्ले कमी झाले असते'
सिडको भागातील एका शाळेमध्ये सातवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शाळेतील शिक्षकानेच मोबाईलमध्ये पॉर्न व्हिडिओ दाखवला आहे. ही घटना सुमारे तीन ते चार आठवड्यापूर्वीची आहे. मुलीच्या वागण्यात बदल आल्याने पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार मुलीने पालकांना सांगितला. त्यानंतर पोलीस आयुक्तांकडे याबाबत तीन दिवसांपूर्वी तक्रार करण्यात आली होती.
आज (मंगळवार) पालकांनी त्या शिक्षकाचे निलंबन करण्यात यावे, यासाठी शाळेत धाव घेतली होती. पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांसह सिडको पोलीस ठाणे गाठले होते. या प्रकरणी दुपारी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना घडून सुमारे तीन ते चार आठवडे झाले आहेत. पालकांनी घडलेला प्रकार शाळा प्रशासनाला सांगितला होता. त्यानंतर संबंधित शिक्षकावर कारवाई होणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता सातवीतील वर्गातून काढून संबंधित शिक्षकाला पहिली ते दुसरीच्या वर्गात वर्ग केले. यावरून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर शाळा प्रशासनाने संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याचे आश्वासन पालकांना दिले.