औरंगाबाद - कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने शाळा कधी सुरू होणार याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहेत. बहुतांश शाळांनी पालकांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय दिला आहे. मात्र, शालेय फीस देण्याबाबत अनेक पालकांना अडचणी असल्याने त्यांना आता बँकेकडून कर्ज उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था काही शाळांनी केली आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकांचे वेतन थकले आहेत. तर अनेकांचे रोजगार गेले असल्याने बहुतांशी लोकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात मुलांच्या शाळेची फीस भरण्याचा मोठा प्रश्न पालकांसमोर आहे. त्यामुळे औरंगाबादच्या गुरुकुल शाळेने पालकांना शालेय फीस भरण्यासाठी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे. तर ज्यांना फीस भरणे किंवा बँकेचे हप्ते भरणे शक्य होणार नाही, अशा पालकांना काही सामाजिक संस्था किंवा दात्यांकडून मदत मिळण्यासाठी पर्याय दिले असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना शाळेचे अर्थचक्र सुरळीत राहावे, याकरिता हे पर्याय दिल्याचे शाळेचे संचालक सतीश तांबट यांनी सांगितले.
औरंगाबादेत शाळेची फीस भरायला बँक कर्जाचा पर्याय - bank debt for school fees
लॉकडाऊनमुळे अनेकांचे वेतन थकले आहेत. तर अनेकांचे रोजगार गेले असल्याने बहुतांशी लोकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात मुलांच्या शाळेची फीस भरण्याचा मोठा प्रश्न पालकांसमोर आहे. त्यामुळे औरंगाबादच्या गुरुकुल शाळेने पालकांना शालेय फीस भरण्यासाठी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे.
लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यास अनेक अडचणी आहेत. ऑनलाईन शिक्षण देण्याचा पर्याय मिळाल्याने थोडा दिलासा मिळाला असला तरी शैक्षणिक शुल्क भरण्याबाबत अनेक अडचणी पालकांना आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे वेतन कमी करण्यात आले आहेत. काही जणांचे वेतन नियमित नाहीये, तर अनेकांचे रोजगार गेले आहेत. अशा अडचणीच्या काळात विद्यार्थ्यांची फीस भरायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात आता अनेक शाळांनी काही पर्याय पालकांना दिले आहे.
औरंगाबादच्या गुरुकुल शाळेने पालकांना बँकेकडून अर्थसहाय्य देण्याची सोय करून देण्यात आली. शालेय शुल्क पुढील नऊ महिन्यात हप्ते स्वरूपात परत करायचे आहे. हप्ते भरत असताना व्याज मात्र शाळा भरणार आहे. त्यामुळे शाळेची आणि पालकांची आर्थिक घडी बिघडणार नाही, अशी माहिती शाळेचे संचालक सतीश तांबट यांनी दिली. शाळेत अनेक प्रकारचे विशेष वर्ग घेतले जातात, त्यासाठी बाहेर राज्यातून शिक्षक आणले आहेत. त्यांचे वेतन अधिक आहेत त्यांना वेळेवर वेतन देणे गरजेचे आहे. त्यात इमारतीचा खर्च आणि इतर खर्च करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे शाळांना शैक्षणिक शुल्क घेणे गरजेचे असल्याचे सतीश तांबट यांनी सांगितले. तर ज्या लोकांना शैक्षणिक शुल्क भरणे शक्य नाही, त्यांच्यासाठी सामाजिक संस्था आणि किंवा दाते आम्ही शोधणार आहोत, असे देखील शाळेच्या व्यवस्थापकांनी सांगितली. शाळांनी दिलेले पर्याय चांगले असल्याचे मत काही पालकांनी व्यक्त केले आहेत. मात्र, शाळांनी देखील काही प्रमाणात मदतीला समोर यायला हवे, असे मत अनेकांनी व्यक्त केले. शाळांनी यावर्षी शुल्क कमी करून बँके ऐवजी स्वतःच हप्ते करून फीस भरण्याची मुभा द्यायला काय हरकत आहे, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. आगामी काळात शाळांची रुपरेषेबाबत अनेक संभ्रम उभे राहतील यात शंका नाही. याबाबत गुरुकुल शाळेचे व्यवस्थापक आणि पालकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी...