औरंगाबादशिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाट (Sanjay Shirsat) यांना स्थान मिळालं नाही. यामुळे वेगवेगळ्याप्रकारे राजकीय चर्चेला ऊत आला होता. याचाच एक भाग म्हणजे औरंगाबादचे भाजपचे माजी उपमहापौर (Former Deputy Mayor of BJP) राजू शिंदे (Raju Shinde) यांनी काही ठिकाणी शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट आगामी निवडणूक भाजप तर्फे लढवतील असं मत व्यक्त केलं. यावर, कायम एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) राहणार असी संजय शिरसाटांची प्रतिक्रीया (Sanjay Shirsat Reaction) आली आहे. चर्चांना शिरसाट यांनी पूर्णविराम दिला आहे. कोणी काही जरी बोलत असलं तरी, मी एकनाथ शिंदे साहेबांसोबत राहीनं. भाजप (BJP) पक्षातील कोणी जर स्वतःचं वैयक्तिक मत व्यक्त केल असेल तर त्याबाबत आपल्याला कल्पना नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
मी शिंदे साहेबांसोबत राहणारसमाज कल्याण विभाग मंत्री अथवा पालकमंत्री पद मिळावं अशी इच्छा संजय शिरसाट यांनी मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी बोलून दाखवली होती. मात्र, शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाट यांना स्थान मिळालं नाही. असं असलं तरी आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांसोबत आपण कायम राहू असं मत शिरसाट यांनी व्यक्त केलं. मतदार संघात काहीजण मुद्दाम चर्चा घडवून आणत आहेत. मात्र, त्याचा परिणाम होणार नाही. अशी टीका देखील शिरसाट यांनी केली.