औरंगाबाद - संजय राऊत ( Sanjay Raut ) शिवसेना संपवाल्याशिवाय राहणार नाही, त्यांचं ध्येय तेच आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena chief Balasaheb Thackeray ) यांच्या विचारांच्या जागी आपले विचार रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 8 दिवस मातोश्रीची दारे बंद करा, चांडाळ चौकडी गुदमरुन मरेल, अशी टिका शिवसेना बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी यावेळी केला आहे.
संजय शिरसाट यांची संजय राऊतांवर टिका संजय राऊत पक्ष डुबवत आहेत - 50 आमदारांनी उठाव केला, तो पैशांसाठी नक्कीच नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी आपण भाजपसोबतच गेले पाहिजे, असे सर्व आमदारांना वाटत होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या भोवतालची चांडाळ चौकडी दिशाभूल करुन, शिवसेनेला मूळ विचारांपासून दूर घेऊन जात होती. आपल्याच आमदारांचे खच्चीकरण करत होती, म्हणून हा उठाव झाला, असा दावा बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी औरंगाबादमध्ये केला आहे.
संजय राऊत सारखा माणूस शिवसेना डुबवायला निघाला आहे. या चांडाळ चौकडीला 8 दिवस मातोश्रीची दारे बंद करावी, ती आपोआप गुदमरुन मरेल, असेही शिरसाट यांनी म्हणाले आहेत. राऊत सारखा माणूस दररोज उठतो, पत्रकार परिषद घेतो, काय ऍक्शन करतो, तो शिवसेना डुबवायला निघाला आहे. उठाव केलेल्या आमदारांविषयीही त्यांनी वाईट शब्द वापरले आहेत. अगदी वेश्या असेही संबोधले आहे. त्यात महिला आमदारही होत्या. त्या जागी त्यांच्या घरातील महिला असती, तर राऊत यांनी तसे शब्द वापरले असते का, असा प्रश्न शिरसाट यांनी संजय राऊतांना केला आहे.
आम्ही बंड नाही उठाव केला -राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे बुधवारी सायंकाळी औरंगाबादेत परतले. यावेळी त्यांचे विमानतळापासून कोकणवाडी येथील कार्यालयापर्यंत जागोजागी जोरदार स्वागत करण्यात आले आहे. संपर्क कार्यालयात पोहचल्यानंतर शिरसाट यांनी बंडामागील कारणे आणि पुढील वाटचाल याबाबत पत्रकारांशी संवाद साधला. शिरसाट म्हणाले, आम्ही शिवसेना सोडलेले नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत. आम्ही केले ते बंड नव्हते तर तो उठाव होता. या उठावाची दखल जगातील 33 देशात घेतली गेली. आमदारांच्या मनामध्ये खूप दिवसांपासून खदखद होती. ती अखेर बाहेर आली. संजय राऊत आणि इतरांची चांडाळ चौकडी शिवसेनेला मूळ विचारांपासून दूर घेऊन जात होती. म्हणून शिवसेना वाचविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. असे आमदार शिरसाट यांनी सांगितले आहे.
स्वागताला 200 गाड्यांचा ताफा -शिवसेना बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं आगमन शहरात झाले आहे. यावेळी शिरसाट समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यास सुरू केले होते. विमानतळ ते कोकणवाडी या मार्गांवर मोठी रॅली काढण्यात आली. यावेळी ताफ्यात जवळपास दीडशे ते दोनशे वाहणांचा सहभाग होता. प्रत्येक गाडीवर भगवा झेंडा आणि कचेवर आमदार संजय शिरसाट यांना समर्थन असणारे पोस्टर लावण्यात आले होते. जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. संजय शिरसाठ ओपन कारमध्ये विराजमान झाले. त्यांच्या गाडीच्या मागे समर्थकांची दोनशे वाहन एका रांगेत नेण्यात आली. यावेळी मोठ शक्ती प्रदर्शन करून शिरसाट समर्थकांनी शिवसेनेला उत्तर दिले आहे.
हेही वाचा -Anandrao Adsul : शिवसेनेला मोठा झटका! शिवसेना नेतेपदाचा राजीनामा, आनंदराव अडसूळ शिंदे गटात जाणार