औरंगाबाद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार ( Cabinet expansion of Shinde Govt ) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात पश्चिम मतदार संघाचे आमदार आणि एकनाथ शिंदे यांचे खास विश्वासू समजले जाणारे संजय शिरसाट ( Aurangabad MLA Sanjay Sirsat ) यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे. आ संजय शिरसाट यांनी समाज कल्याण खाते ( Social Welfare Department ) मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर पालकमंत्री पद मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न असल्याचेही देखील बोललं जात आहे.
Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांची शिंदे सरकारमधे कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता - Cabinet expansion of Shinde Govt
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार ( Cabinet expansion of Shinde Govt ) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये शिंदे यांचे खास विश्वासू समजले जाणारे संजय शिरसाट ( Aurangabad MLA Sanjay Sirsat ) यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे.
![Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांची शिंदे सरकारमधे कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता Etv Bharat](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16017554-thumbnail-3x2-sanjaysirsath1.jpg)
कोण आहेत संजय शिरसाट? -आमदार संजय शिरसाट यांनी सलग तीन वेळा विधानसभा निवडणूक पश्चिम मतदार संघातून जिंकली आहे. १९९० च्या काळात रिक्षा चालक असलेले संजय शिरसाट शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी महानगर पालिका निवडणूक लढवत नगरसेवक पद मिळवलं. त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. महापालिकेत स्थायी समिती सभापती पद मिळविले. यानंतर २००९ च्या निवडणुकीत नव्याने निर्माण झालेल्या पश्चिम मतदार संघात आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर सलग तीन वेळा आमदार म्हणून ते निवडून आले. २०१९ मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी अपेक्षा त्यांना होती.