औरंगाबाद- गावी गेलेल्या एका निवृत्त सिव्हिल सर्जनचे घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना सिडको एन-4 मध्ये उघडकीस आली. मात्र, नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला हे स्पष्ट होऊ शकले नाही.
औरंगाबादमध्ये सिव्हिल सर्जनच्या घरी चोरी हेही वाचा -औरंगाबादेमध्ये रंगली चित्र प्रदर्शनाची हुरडा पार्टी; अपघातावर मात करत आश्विनीने आयुष्यात भरले रंग
निवृत्त सिव्हिल सर्जन डॉ. एन. जी. कलवले हे काही कामानिमित्त मुंबई येथे आपल्या कुटुंबासह गेले होते. चोरट्यांनी संधी साधून रात्री त्यांच्या घरावर पाळत ठेवत चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सिडको एन. ४ येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांची घरकामवाली पहाटे आली असता, ही घटना उघडकीस आली. त्यांनी लगेच ही माहिती डॉ. कलवले यांना सांगितली. त्यानंतर कलवले यांनी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. कलवले घरी परतल्यावरच चोरीची रक्कम किती होती, हे स्पष्ट होईल अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी दिली.