औरंगाबाद - शस्त्रक्रियेसाठी बाहेरगावी गेलेल्या दूध डेअरीतील निवृत्त व्यवस्थापकचा बंगला फोडून तब्बल दोन लाखांची रोकड व काही मौल्यवान वस्तू चोरट्याने लंपास केल्याची ( Retired manager's house burglarized ) खळबळ जनक घटना गुरुसहानी नगर येथे उघडकीस आली.
शस्त्रक्रियेसाठी गेले होते जालन्याला -
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सुभाषचंद्र रामचंद्र बांगड (वय ६०) रा. धरती धन प्लाझा गुरुसहानी नगर हे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या दूध डेअरीमध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरीला होते. दोन वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी ते दि. २० रोजी जालन्याला गेले होते. शस्त्रक्रिया होणार असल्याने घरातील सर्व सदस्य जालना येथे गेले होते. दरम्यान सोबत कपडे घेऊन गेले नसल्याने रविवार दि. २१ रोजी मोठी मुलगी सुजाता आणि गोविंदा हे कपडे घेण्यासाठी घरी आले. यावेळी त्यांनी कपडे व इतर वस्तू घेऊन जालन्याला गेले.