महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MARD Strike In Aurangabad : निवासी डॉक्टरांचा संपात सहभाग; घाटी रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम - Residential doctors strike

राज्यभरात डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामध्ये घाटी रुग्णालयातील डॉक्टर सहभागी झाले ( Maharashtra MARD Doctors Strike ) आहेत. आपत्कालीन सेवा वगळता इतर कामे निवासी डॉक्टर करणार नसल्याचे मार्डचे अध्यक्ष अक्षय क्षीरसागर ( MARD President Akshay Khirsagar on strike यांनी सांगितले. यामुळे बाह्यरुग्ण विभाग तसेच नियोजित करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया या ( MARD Strike impact on doctors service ) संपामुळे होणार नाहीत.

निवासी डॉक्टारांचा संप
निवासी डॉक्टारांचा संप

By

Published : Jan 1, 2022, 6:56 PM IST

Updated : Jan 1, 2022, 7:44 PM IST

औरंगाबाद - नवीन निवासी डॉक्टरांची प्रवेश प्रक्रिया ( New Residential doctors admission procedure ) अद्याप सुरू न झाल्याने उपलब्ध निवासी डॉक्टरांवर रुग्णसेवेचा ताण येत आहे. अशा परिस्थितीत विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने शनिवारपासून संप सुरू केला आहे. दुसरीकडे विविध मागण्यांसाठी राज्यभर निवासी डॉक्टरांचा संप ( Maharashtra MARD Doctors Strike ) सुरू झाला आहे.

राज्यभरात डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामध्ये घाटी रुग्णालयातील डॉक्टर सहभागी झाली आहेत. आपत्कालीन सेवा वगळता इतर कामे निवासी डॉक्टर करणार नसल्याचे मार्डचे अध्यक्ष अक्षय क्षीरसागर ( MARD President Akshay Khirsagar on strike ) यांनी सांगितले. यामुळे बाह्यरुग्ण विभाग तसेच नियोजित करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया या संपामुळे होणार नाहीत. या संपाचा रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे.

निवासी डॉक्टरांचा संपात सहभाग
हेही वाचा-COVID-19 Vaccine : 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण नोंदणी सुरू, जाणून घ्या प्रक्रिया


मागणी मान्य न झाल्यास रुग्णसेवेवर होणार परिणाम
नव्या निवासी डॉक्टरांची प्रवेश प्रक्रिया होत नसल्यामुळे जुन्याच डॉक्टरांचा कामाचा ताण वाढत आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे कामदेखील या निवासी डॉक्टरांना करावे लागत आहे. रुग्णांना सेवा देताना अनेक वेळा दोन दोन दिवस सुट्ट्या मिळत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाने तात्काळ या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्या पाहिजे. तरच तिसर्‍या लाटेतचा सामना करताना आरोग्य यंत्रणेवर ताण येणार नाही ( MARD Strike impact on doctors service ) असेदेखील संपकरी डॉक्टरांनी सांगितलं.

हेही वाचा-मुंबईकरांना राज्य सरकारकडून नववर्षाचं मोठं गिफ्ट.. 500 स्क्वेअर फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ

Last Updated : Jan 1, 2022, 7:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details