महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बकरी चरताना वाद : जखमी तरुणाच्या मृत्यूने घाटीत नातेवाईकांचा ठिय्या - घाटी रुग्णालयात जखमी तरुणाचा मृत्यू बातमी

आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देऊन, जोशी परिवाराला ५० लाखाची मदत सरकारने करावी. तसेच जोशी परिवारातील एक सदस्याला सरकारी नोकरीत सामावून घेण्याची मागणी करत त्यांनी तिथेच ठिय्या मांडला. त्यानंतर धनगर समाजाचे शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदन दिले. दुपारी उशिरापर्यंत त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता.

relatives agitation in ghati hospital for injuered youth died at aurangabad
बकरी चरताना वाद : जखमी तरुणाच्या मृत्यूने घाटीत नातेवाईकांचा ठिय्या

By

Published : Oct 8, 2020, 3:49 PM IST

Updated : Oct 8, 2020, 4:17 PM IST

औरंगाबाद -भोकरदन तालुक्यातील चिंचोली शिवार येथे दि. ४ ऑक्टोबरला शेतात बकरी चारण्यासाठी आणली म्हणून तरुणाशी वाद घालत त्याला मारहाण करण्यात आली होती. त्याला जखमी अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी त्या तरुणाचा मृत्यू झाला. रामदास कडूबा जोशी (वय -38, रा. चिंचोली शिवार ता. भोकरदन जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही माहिती मिळताच नातेवाईकांनी घाटी गाठत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत, घाटीत ठिय्या मांडला.

जखमी तरुणाच्या मृत्यूने घाटीत नातेवाईकांचा ठिय्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचोली शिवारात जोशी हे आपल्या बकऱ्या चारण्यासाठी नेत होते. दि. ४ ऑक्टोबरला बकरी चरत चरत एका शेतात शिरली. शेतात बकरी अली म्हणून तिथे असलेल्या सहा ते सात जणांना त्याचा राग आला. त्यांनी जोशी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात जोशी गंभीर जखमी झाले. त्याच दिवशी त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी नातेवाईक घाटी रुग्णालयात आले. त्यांच्यासह धनगर समाजाचे कार्यकर्तेही आले होते. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देऊन, जोशी परिवाराला ५० लाखाची मदत सरकारने करावी. तसेच जोशी परिवारातील एक सदस्याला सरकारी नोकरीत सामावून घेण्याची मागणी करत त्यांनी तिथेच ठिय्या मांडला. त्यानंतर धनगर समाजाचे शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदन दिले. दुपारी उशिरापर्यंत त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता.
Last Updated : Oct 8, 2020, 4:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details