औरंगाबाद- साहेब आमच्यात मध्यस्थी करा, अशी विनंती वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे ( Vaijapur MLA Ramesh Bornare ) यांनी सेना नेते चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire on Rebel MLA ) यांच्याकडे केली आहे. शनिवारी सायंकाळी त्यांनी फोनवर संपर्क करत चंद्रकांत खैरे यांना विनंती केली.
ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये असलेले वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी शनिवारी थेट शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना फोन करून बंडखोर आमदार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray latest news ) यांच्यामध्ये मध्यस्थी घडवून आणण्याची विनंती केली. यावर खैरे यांनीही तुम्ही या, मी मध्यस्थी करतो. तुमची उद्धव साहेबांशी भेट घडवून आणतो असे उत्तर दिले.
वैजापूरचे बंडखोर आमदार रमेश बोरनारे यांचा फोन-या संभाषणात जिल्हाप्रमुखांनी तुमच्याविरोधात काम केले होते, असा उल्लेख आमदार रमेश बोरनारे यांनी केला. त्यावर खैरे यांनी ठीक आहे, अंबादास दानवे यांनी माझ्याविरोधात काम केले. याची कल्पना मला पण आहे. पण एक दिवस त्यांना याबाबत भोगावे लागेल, असे म्हटले. सेनेत झालेल्या बंडानंतर शनिवारी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी खैरे यांना एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये असलेले वैजापूरचे बंडखोर आमदार रमेश बोरनारे यांचा फोन आला. त्या दोघांमधील संवाद समोर आला आहे. त्यात साहेब, राऊतांमुळे बिघडले, आता तुम्हीच मध्यस्थी करा, अस बोरनारे यांनी शिवसेना नेते खैरे यांना सांगितले.
एकनाथ शिंदे यांचे भावनिक ट्विट-नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेच्या बंडामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे एकनाथ शिंदेवर सातत्याने टीकास्त्र करत आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत शिवसैनिकांना भावनिक आवाहनं केलं ( Eknath Shinde On Shivsainik ) आहे. मविआसारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना अन् शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं ( Eknath Shinde Criticized Mahavikas Aghadi ) आहे.