महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raosaheb Danven Reaction : संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेली कारवाई कोणत्याही सूडबुद्धीने करण्यात आलेली नाही - रावसाहेब दानवे - औरंगाबाद ताजी बातमी

गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात अनियमितता आढळून आल्याने संजय राऊत ( ED Raided to Sanjay Raut ) यांची ईडीमार्फत कारवाई करण्यात आली. खासदार संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेली कारवाई कोणत्याही सूडबुद्धीने ( Vindictiveness ) करण्यात आलेली नाही. या पूर्वी नरेंद्र मोदी यांचा छळ करण्यात आला, लालूप्रसाद यादव यांच्यावरही कारवाई करण्यात आली. मात्र, असे म्हणता येत नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ( Union Minister Raosaheb Danve ) यांनी व्यक्त केली आहे.

Raosaheb Danven Reaction
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

By

Published : Jul 31, 2022, 2:15 PM IST

औरंगाबाद :शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने छापेमारी ( ED Raided to Sanjay Raut ) केली आहे. या पूर्वीही अनेक नेत्यांवर अशा पद्धतीची कारवाई झाली आहे. त्यामुळे ही कारवाई सूडबुद्धीने ( Vindictiveness ) केली असे म्हणता येणार नाही. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेली कारवाई कोणत्याही सूडबुद्धीने करण्यात आलेली नाही. या पूर्वी नरेंद्र मोदी यांचा छळ करण्यात आला, लालूप्रसाद यादव यांच्यावरही कारवाई करण्यात आली. मात्र, असे म्हणता येत नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ( Union Minister Raosaheb Danve ) यांनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

संजय राऊतांविरोधात ईडी कारवाई : मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात अनियमितता आढळून आल्याने संजय राऊत यांची ईडीमार्फत चौकशी सुरू होती. पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी ईडीकडे तक्रार केली होती. ईडीने राऊत यांना ईडीकडून वारंवार समन्स बजावण्यात आले होते. १ जुलै रोजी ईडीने १० तास चौकशी केली. त्यानंतर पुन्हा दोन वेळा संजय राऊत यांना समन्स बजावले. मात्र, संसदेचे अधिवेशन सुरू असल्याचे सांगत राऊत यांनी मुदत वाढ मिळावी, अशी मागणी केली होती. आज पहाटे ईडीच्या पथकाने राऊत यांच्या घरी धाड टाकली असून चौकशीला सुरूवात केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारची सुरक्षा व्यवस्था घराबाहेर तैनात केली आहे.

जालना लोकसभा भाजपकडे :जालना लोकसभा मतदारसंघ हा गेली 45 वर्षे भाजपाकडे आहे. अत्यंत कसलेल्या आणि आम्ही तयार केलेल्या लोकसभा मतदारसंघात आम्ही अन्य कोणत्याही पक्षाला पाय ठेवू देणार नाही, असा इशाराच रावसाहेब दानवे यांनी दिला. त्यामुळे अर्जुन खोतकर किंवा अन्य कोणाला उमेदवारी देण्याचा प्रश्नच येत नाही, असेही दानवे म्हणाले. खोतकर हे विधान सभेचे सदस्य, आमदार आहेत. मी लोकसभेचा सदस्य, खासदार आणि केंद्रात मंत्री आहे. आमच्या दोघांचे कार्यक्षेत्र वेगवेगळे आहे. त्यामुळे एकमेकाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप होऊच शकत नाही.


खोतकर यांनी भाजपला बदनाम करू नये :खोतकर यांना जर ईडीने कारवाई केली असेल, तर ती त्यांच्या काही वैयक्तिक गोष्टींमुळे असेल. त्यामध्ये भाजप किंवा अन्य कुणाचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला बदनाम करू नये. त्यांनी शिंदे गटात केलेला प्रवेश हा राजकीय व्यवस्थेमुळे असू शकतो, हे त्यांनी यापुढे सांगावे, असा सल्लाही दानवे यांनी दिला.

दिल्लीत खोतकरांचे दानवेंनी केले होते स्वागत : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांना पेढा भरवून त्यांचे शिंदे गटात स्वागत केल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वीच खोतकर यांनी आपण ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असून शिंदे गटात कधीही जाणार नाही, असा दावा केला होता. मात्र, आज शिंदे गटात खोतकर यांनी प्रवेश केल्यास हा जिल्ह्यातील शिवसेनेला मोठा धक्का मानला जाणार आहे.

कुणी काहीही म्हटले तरी आमचे मनोमिलन झाले आहे :राजकारणात कुणी कुणाचा कायचमा शत्रू नाही. खोतकरांना आज नाष्टा आणि चहा पाण्याचे निमंत्रण दिले होते, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. आमचे मनोमिलन झाले आहे असे विधान दानवेंनी केले होते. जालन्यात जाऊन भूमिका स्पष्ट करणार, असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले होते. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंची दिल्लीमध्ये भेट घेतली आहे. याबाबत रावसाहेब दानवे म्हणाले, की, राजकारणात कुणी कुणाचा कायचमा शत्रू नाही. खोतकरांना आज नाष्टा आणि चहा पाण्याचे निमंत्रण दिले होते, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. जालन्यात जाऊन भूमिका स्पष्ट करणार, असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

अर्जुन खोतकर यांच्यावर नुकतीच ईडीची कारवाई - अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित जालना सहकारी साखर कारखान्यावर ईडीने फास कसला असून, कारखान्याची मालमत्ता, जमीन, यंत्रसामग्री सील केली आहे. त्यामुळेच, खोतकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. मात्र, खोतकर हे शिंदे गटात सामील झाले आहेत की नाही याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी दिल्लीत शिंदे गटाच्या नेत्यांची भेट घेतल्याचे बोलले जाते.

खोतकरांनी दिले होते स्पष्टीकरण - मराठवाड्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. गेल्या आठ दिवसांपासून खोतकर दिल्लीत तळ ठोकून होते. त्यानंतर ते काल जालन्यात दाखल झाले आहेत. आज त्यांनी आपली भूमिका मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन केलं आहे. या घोषणेवेळी खोतकर यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. ईडीच्या कारवाईमुळे माझ्यावर संकट आले आहे. त्यामुळं मी दडपनाखाली असून हा निर्णय घेत असल्याचे खोतकर यांनील यावेळी सांगितले आहे. हा निर्णय घेण्याआधी ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बोलले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. आणि कारवाई टाळायची असेल तर तुम्ही तुमचा योग्य तो निर्णय घ्या, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले असल्याचे खोतकरांनी यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा :Why ED taking Action Against Sanjay Raut : संजय राऊतांवर ईडीची कारवाई सुरू, जाणून घ्या, आरोप आणि कारणे

ABOUT THE AUTHOR

...view details