महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अवैध दारू अड्डा चालविणाऱ्या हॉटेलवर गुन्हे शाखेचा छापा, 28 ताब्यात - हॉटेल दरबार बातमी

औरंगाबाद-बीड बायपास रस्त्यावरील हॉटेल दरबार येथे विना परवाना सुरू असलेल्या दारुच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. याप्रकरणी हॉटेल मालकासह 28 जणांचा ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

auragabad
auragabad

By

Published : Aug 13, 2020, 5:06 PM IST

औरंगाबाद - येथील औरंगाबाद-बीड बायपास वरील हॉटेल दरबारवर विना परवाना दारुचा अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळली होती. यावरुन पथकाने छापा टाकला. याप्रकरणी हॉटेल मालकासह 28 जणांवर पुंडलीकनगर पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाने हॉटेल, बार यामध्ये बसून जेवण अथवा मद्यपान करण्यास बंदी घातली आहे. मात्र, बीड बायपास येथे दरबार हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात दारू आणून पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती गुन्हेशाखेच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल सह हवलदार शिवाजी झिने, राजेंद्र साळुंखे, प्रकाश चव्हाण यांच्या पथकाने रात्री उशिरा हॉटेल दरबारवर छापा टाकला. त्यावेळी तेथे शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांना पायदळी तुडवत अनेक जण सोशल डिस्टन्सिंग न पाळता दारू रिचवताना आढळले.

याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल चालक बालाजी माणिकराव खोकले (वय 26 वर्षे, रा.सातारा परिसर) यासह दोन वेटर आणि पंचवीस ग्राहक, असे 28 जणांना पकडले. त्यांच्या विरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहय्यक पोलीस आयुक्त डॉ. दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल यांच्या पथकाने केली.

ABOUT THE AUTHOR

...view details