औरंगाबाद -शहाबजार येथील स्मशानभूमीत काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला, पोलिसांचा छापा पडताच जुगार खेळणाऱ्यांची पळापळ सुरू झाली, काही व्यक्ती या फरार झाल्या तर काही जणांनी शेजारीच असलेल्या नाल्यात उड्या मारल्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
औरंगाबादेत जुगार अड्ड्यावर छापा, जुगाऱ्यांनी मारल्या नाल्यात उड्या - औरंगाबाद लेटेस्ट न्यूज
शहाबजार येथील स्मशानभूमीत काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला, पोलिसांचा छापा पडताच जुगार खेळणाऱ्यांची पळापळ सुरू झाली, काही व्यक्ती या फरार झाल्या तर काही जणांनी शेजारीच असलेल्या नाल्यात उड्या मारल्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
स्मशानभूमीत सुरू होता जुगार अड्डा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहाबाजार येथील स्मशानभूमीत जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी छापा टाकण्यात आला. पोलीस आल्याची माहिती मिळताच जुगाऱ्यांचा एकच गोंधळ उडाला, पळापळ सुरू झाली. काही जण फरार झाले तर काही जणांनी शेजारच्या नाल्यात उड्या टाकल्या, काही जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आले. यावेळी पोलिसांनी शेख इरफान शेख गफ्फार, अविनाश टीई, रावसाहेब लांडगे, चेतन हरिचंद्र देहाडे, संदीप री, अशोक दाभाडे यांना ताब्यात घेतले.