औरंगाबाद : दूध न आणल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर पतीने पत्नीला तलाक दिल्याची घटना औरंगाबादमधून समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून शहरातील सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलाक, तलाक, तलाक... दूध न आणल्याने पत्नीला मारहाण करुन दिला तलाक, घरातून काढले - सिटी चौक पोलीस ठाणे
दूध आणण्यासाठीही तुमच्याकडे पैसे नाही का असा सवाल पत्नीने केला. यावर संतप्त झालेल्या शाहबाजने पत्नीला मारहाण करत तिला तीन तलाक देत घरातून हाकलून दिले.
किरकोळ वादानंतर दिला तलाक
याविषयी पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, शहरातील सिटी चौक परिसरातील अरहान गोल्ड नाज टॉवर येथील रहिवासी शहबाज आली खान मकसूद अली खान(वय.३२) याला पत्नीने दूध आणण्यास सांगितले होते. मात्र शाहबाजने दूध आणले नाही. यावर तुम्ही दूध का आणले नाही अशी विचारणा पत्नीने केली असता त्याने पैसे नसल्याचे कारण सांगितले. यावेळी दूध आणण्यासाठीही तुमच्याकडे पैसे नाही का असा सवाल पत्नीने केला. यावर संतप्त झालेल्या शाहबाजने पत्नीला मारहाण करत तिला तीन तलाक देत घरातून हाकलून दिले. तसेच परत घरी आल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर पीडित महिलेने थेट सिटी चौक पोलीस ठाणे गाठत सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पतीविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.