औरंगाबाद -पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर आक्रमक होत लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला भाजपचे मोठे नेते उपस्थित आहेत. या उपोषणादरम्यान खासदार प्रीतम मुंडे यांनी भाजप सरकारच्या काळात सुरू झालेली विकासकामे थांबू नये, अशी मागणी केली आहे. तसेच संबंधित योजनांमधील बदल सकारात्मक असावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीने योजनांमध्ये सकारात्मक बदल करावेत; प्रीतम मुंडेंची मागणी - खासदार प्रीतम मुंडे
पंकजा मुंडे यांच्या लाक्षणिक उपोषणाला भाजपचे मोठे नेते उपस्थित आहेत. या उपोषणादरम्यान खासदार प्रीतम मुंडे यांनी भाजप सरकारच्या काळात सुरू झालेली विकासकामे थांबू नये, अशी मागणी केली आहे.
![महाविकास आघाडीने योजनांमध्ये सकारात्मक बदल करावेत; प्रीतम मुंडेंची मागणी pritam munde in aurangabad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5857061-thumbnail-3x2-preetammma.jpg)
भाजपने 'जलयुक्त शिवार' सारख्या चांगल्या योजना सुरू केल्या. मात्र, त्याआधी 15 वर्ष पाण्यासाठी कोणतीही योजना सुरू असल्याचे चित्र नव्हते, असे त्या म्हणाल्या. भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेली कामे थांबवली जाऊ नये, अशी मागणी प्रीतम मुंडे यांनी केली. हे उपोषण सरकारच्या विरोधात नाही, तर मराठवाड्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी असल्याचे खासदार प्रीतम यांनी सांगितले.
'वॉटर ग्रीड' सारखा प्रकल्प मराठवाड्यातील दुष्काळ कमी करण्याचे काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या उपक्रमात नवीन सरकार बदल करत असल्यास ते सकारात्मक असावे, अशी आशा प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली आहे.