औरंगाबाद - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसून येत आहेत. प्रहार संघटनेने औरंगाबादच्या गारखेडा परिसरात आंदोलनाला सुरुवात केली. दुपारी बारा वाजेपासून प्रहारचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढले असून दानवे यांनी माफी मागावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
रावसाहेब दानवेंनी माफी मागावी... प्रहारचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर - prahar sanghta andolan
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसून येत आहेत. प्रहार संघटनेने औरंगाबादच्या गारखेडा परिसरात आंदोलनाला सुरुवात केली. दुपारी बारा वाजेपासून प्रहारचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढले असून दानवे यांनी माफी मागावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी फुलंब्री तालुक्यातील जाहीर कार्यक्रमात शेती विषयक नवीन कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे सांगितले. तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा केला. त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विविध स्तरांतून दानवे यांच्या विधानाचा निषेध नोंदवण्यात येत आहे.
पाण्याच्या टाकीवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन
बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतर्फे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. औरंगाबादेत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारत गारखेडा परिसरात पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलनाला सुरुवात केली. दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत पाण्याच्या टाकीवरच कार्यकर्त्यांनी जाळपोळ केली. रावसाहेब दानवे यांनी प्रसार माध्यमांसमोर जाहीर माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. मागण्या मान्य होईपर्यंत पाण्याच्या टाकीवरून उतरणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.