महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aurangabad Goldsmith Robbery : जळगाव येथील सोनाराला पोलीस कर्मचाऱ्याने 21 लाखांनी लुटले; गुन्हा दाखल - सोनाराला पोलीस कर्मचाऱ्याने 21 लाखांनी लुटले

पोलिसानेच लुटमार policeman robbed goldsmith केल्याची धक्कादायक घटना सोयगाव परिसरात समोर आली. पोलिस ठाण्याच्या अंमलदाराने चक्क एका सहकाऱ्याच्या साह्याने तब्बल साडेबारा लाखांचे सोन्याचे दागिने आणि साडेआठ लाखांची रोकड अशी सुमारे २१ लाखांची लूट Aurangabad Goldsmith Robbery केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सिडको एमआयडीसी पोलिसांनी या लुटारू पोलिसाच्या मुसक्या आवळल्या goldsmith robber arrested at Aurangabad असून, संतोष तेजराव वाघ असे आरोपी पोलिसाचे नाव आहे.

जळगाव येथील सोनाराला पोलीस कर्मचाऱ्याने 21 लाखांनी लुटले
जळगाव येथील सोनाराला पोलीस कर्मचाऱ्याने 21 लाखांनी लुटले

By

Published : Sep 16, 2022, 1:57 PM IST

औरंगाबाद :लुटमार करणाऱ्यांना पकडण्याचे काम असणाऱ्या पोलिसानेच लुटमार policeman robbed goldsmith केल्याची धक्कादायक घटना सोयगाव परिसरात समोर आली. पोलिस ठाण्याच्या अंमलदाराने चक्क एका सहकाऱ्याच्या साह्याने तब्बल साडेबारा लाखांचे सोन्याचे दागिने आणि साडेआठ लाखांची रोकड अशी सुमारे २१ लाखांची लूट Aurangabad Goldsmith Robbery केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सिडको एमआयडीसी पोलिसांनी या लुटारू पोलिसाच्या मुसक्या आवळल्या goldsmith robber arrested at Aurangabad असून, संतोष तेजराव वाघ असे आरोपी पोलिसाचे नाव आहे. policemand arrested for robbing goldsmith


जळगाव येथून व्यापारी आला शहरात - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात अशोक जगन्नाथ विसपुते यांनी फिर्याद दाखल केली आहे. विसपुते हे जळगाव येथील सोन्या-चांदीचे व्यापारी आहेत. शेंद्रा एमआयडीसी परिसरातील रामचंद्र दहिवाळ याने इतर काही जणांच्या माध्यमातून विसपुते यांच्याशी संपर्क साधत दागिने खरेदीची तयारी दर्शवली. त्यानुसार त्यांना दागिने घेऊन १२ सप्टेंबर रोजी औरंगाबादेत बोलावले. विसपुते कारने औरंगाबादेत पोहोचल्यावर शेंद्रा येथे जावून दहिवाळ याला भेटले. तेथे त्यांनी दहिवाळ याला दागिने दाखवले. आधी नगदी खरेदीची बोली करणाऱ्या विसपुते यांच्याकडील दागिने पाहणे झाल्यावर मात्र शब्द फिरवून दागिने उधारीत देण्याची मागणी केली. त्यास विसपुते यांनी नकार दिल्याने दोघांमधील सौदा फिसकटला. त्यानंतर विसपुते ती दागिन्यांची बॅग घेऊन परत निघाले.


पोलीस मित्राला दिली माहिती -या दरम्यानच्या काळात दहिवाळ याने व्हाट्सअपच्या माध्यमातून विसपुते यांच्या कारचा फोटो आपला पोलिस मित्र संतोष वाघ याला पाठवला. वाघ याने तातडीने लाल रंगाच्या महिंद्रा केयूव्ही कारने विसपुते यांच्या गाडीचा पाठलाग सुरु केला आणि रात्री दहा वाजेच्या सुमारास जालना रोडवरील केम्ब्रिज चौकात त्यांना रोखले. यानंतर त्यांना दमदाटी करून त्यांच्या बॅगमधील १२ लाख ३५ हजार ५३७ रुपयांचे सोन्याचे दागिने, यामध्ये सोन्याच्या अंगठ्या व अन्य दागिने तसेच ८ लाख ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण २० लाख ७० हजार ५३७ रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला.


पोलिसांनी केली कारवाई -अचानक झलेल्या या प्रकारामुळे अशोक विसपुते घाबरून गेले आणि त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे ते तातडीने जळगावला निघून गेले. बुधवारी बरे वाटू लागल्यावर औरंगाबादेत येऊन त्यांनी याबाबत एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री १२ वाजून २४ मिनिटांनी गुन्ह्याची नोंद केली. यानंतर तातडीने तपास सुरु करून सर्वात आधी रामचंद्र दहिवाळ याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून लूट करणारा पोलीस अंमलदार संतोष तेजराव वाघ याचे नाव समोर आले. पोलिसांनी तातडीने चक्री फिरवून संतोष वाघच्या मुसक्या आवळल्या. दहिवाळ व वाघ यांच्याविरोधात भादंविच्या कलम ३९२, १२० (ब) आणि ३४ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अर्जुन राऊत करीत आहेत. दरम्यान, संतोष तेजराव वाघ हा ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असल्याने, सिडको एमआयडीसी पोलिसांनी तातडीने त्याच्या अटकेची माहिती पोलिस अधीक्षकांना कळविली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details