औरंगाबाद- चोरट्या विक्रीसाठी अवैधरित्या घरात साठून ठेवलेल्या लाखोंच्या गुटख्यावर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा मारला. यावेळी पोलिसांनी अडीच लाखाच्या गुटख्यासह एका आरोपीस अटक केली आहे. महेंद्र सोमनाथ बियाणी, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुटख्याच्या अवैध साठ्यावर पोलिसांचा छापा; अडीच लाखाचा ऐवज जप्त - छापा
पोलिसांनी अडीच लाखाच्या गुटख्यासह एका आरोपीस अटक केली आहे. महेंद्र सोमनाथ बियाणी, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मागील एक ते दीड महिन्यापासून आरोपी बियाणी हा छुप्या पद्धतीने प्रतिबंधित गुटख्याचा घरात साठा करून किरकोळ विक्रेत्यांना विकत होता. ही बाब खबऱ्याने पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना दिली. उपनिरीक्षक खाटके आणि हवालदार रमेश सांगळे यांच्या पथकाने गजानननगर भागात पाळत ठेऊन छापा मारला. यावेळी बियाणीच्या घरात तब्बल अडीच लाखाचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा मिळून आला. पोलिसांनी बियाणीला अटक करत गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली आहे.