औरंंगाबाद - सातारा परिसरातील एका घरात सुरू असलेल्या कुंटनखान्यावर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने शनिवारी संध्याकाळी छापा मारला. यात पोलिसांनी चार जणांसह एका महिलेला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ती महिला दिल्लीवरुन विमानाने शहरात आली आहे.
सातारा परिसरातील कुंटनखान्यावर पोलिसांचा छापा
वरद ऍव्हेन्यू गट नंबर २२ बजाज हॉस्पिटलच्या मागे सातारा परिसर येथे कुंटनखाना सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांना मिळाली होती. पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने शनिवारी संध्याकाळी कुंटनखान्यावर बनावट ग्राहक पाठवून कुंटनखाना सुरू असल्याची खात्री केली. त्यानंतर विशेष पथकाने या कुंटनखान्यावर छापा मारला. त्यावेळी देहविक्री करण्यासाठी आलेली महिला आणि कुख्यात दलाल तुषार राजेंद्र राजपुत, प्रविण बालाजी कुरकुटे, रितेश प्रकाश शेट्टी, कैलास ब्रम्हदेव पासवान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
वरद ऍव्हेन्यू गट नंबर २२ बजाज हॉस्पिटलच्या मागे सातारा परिसर येथे कुंटनखाना सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांना मिळाली होती. पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने शनिवारी संध्याकाळी कुंटनखान्यावर बनावट ग्राहक पाठवून कुंटनखाना सुरू असल्याची खात्री केली. त्यानंतर विशेष पथकाने या कुंटनखान्यावर छापा मारला. त्यावेळी देहविक्री करण्यासाठी आलेली महिला आणि कुख्यात दलाल तुषार राजेंद्र राजपुत, प्रविण बालाजी कुरकुटे, रितेश प्रकाश शेट्टी, कैलास ब्रम्हदेव पासवान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या कडून मोबाईलसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. या आधी ही तुषार राजपूत, प्रवीण कुरकुटेवर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर एमपीडीएची कारवाई देखील झाली होती. याच वर्षतील त्यांच्यावर झालेली ही दुसरी कारवाई आहे. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहे. सपोनि राहुल रोडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.