औरंगाबाद - हिजाब गर्ल म्हणून प्रसिद्ध झालेल्या मुस्कानच्या (Hijab Girl Muskan) सभेवरून शहरात तनावजन्य स्थिती निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या उपस्थितीत आयोजित सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्या हा तणाव निर्माण झाला आहे.
वंचिततर्फे करण्यात आले होते सभेचे नियोजन-
सोमवारी (14 मार्च) हिजाब गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुस्कानचा जाहीर सत्कार आमखास मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीतीत हा सत्कार सोहळा आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी सभा परवानगी पोलिसांनी नाकारली. इतकंच नाही तर मुस्कानला जिल्हाबंदी देखील घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांच्या नोटीस विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे, अशी माहिती प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली आहे.
सुनावणीस खंडपीठाचा नकार -
वंचित बहुजन आघाड़ी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रंटने आयोजित् केलेल्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे वंचित आघाडी तर्फे दाखल याचिकेवर सुनावणी घेण्यास खंडपीठाने नकार दिला आहे. तर पुढील सुनावणी 24 मार्च रोजी घेण्यात येणार असल्याचे न्यायाल्याने सांगितले.