औरंगाबाद - जखमी अवस्थेमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमधून समोर आला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना पुंडलिक नगर पोलीस स्टेशन समोर घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सुनिल मगर असे या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी तक्रार ऐकूण न घेतल्याचा कुटुंबाचा आरोप
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सुनिल मगर आणि सोनू गुरी यांच्यात वाद झाला होता. वादात सुनील याच्या डोक्याला मार लागल्याने तो जखमी झाला. दरम्यान या मारहाण प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी सुनिल मगर हा पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात आला होता. मात्र सुनिल याची तक्रार पोलिसांनी ऐकूण न घेतल्याचा आरोप सुनिलच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच सुनिलला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप देखील त्याच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हेही वाचा -शुल्लक कारणावरून तरुणाची हत्या, दोघांना अटक