औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचारासाठी आणलेला एक अट्टल गुन्हेगार सोमवारी(ता.3) पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. सात दिवसांपासून तो पोलिसांना चकमा देत होता. मात्र खाबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शेख शकील यास जोगेश्वरी येथील घरातून एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली.
पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेला अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
सात दिवसांपासून तो पोलिसांना चकमा देत होता. मात्र खाबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शेख शकील यास जोगेश्वरी येथील घरातून एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली.
खबऱ्याने माहिती दिल्याने अडकला जाळ्यात
शेख शकील शेख आरेफ(२५, रा. कासंबरी दर्गा परिसर, पडेगाव) असे अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. शकीलाच्या कानाच्या पाठीमागे गाठ आल्याने ता. ३ मे रोजी सहायक फौजदार अंबादास पवार यांनी घाटीत उपचारासाठी आणले होते. यावेळी शकीलने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला होता. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी त्याच्या शोधार्थ पथके रवाना केली होती. एमआयडीसी वाळूज ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांना खबऱ्याने माहिती दिली की, हा आरोपी जोगेश्वरीत लपून बसलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक चेतन ओगले यांच्या पथकातील सहायक फौजदार पाटील, बंडू गोरे, दीपक कोलिमी व किशोर गाडे यांनी त्याला अटक केली.