महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबादेतील ऑरीक सिटी प्रकल्पामुळे अनेकांना रोजगाराची संधी - पंतप्रधान - ऑरीक सिटी प्रकल्प

राज्यातील बचतगटांतील जवळपास एक लाख महिलांचा मेळावा औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ऑरीक सिटीचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Sep 7, 2019, 9:43 PM IST

औरंगाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑरीकच्या महत्त्वाच्या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी मोदी म्हणाले की, औरंगाबादेत अनेक व्यवस्थांची सुरुवात होऊन स्मार्ट शहर होत आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी औरंगाबादेत काम करायला सुरुवात केली असून या माध्यमातून लाखो युवकांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. राज्यातील बचतगटांतील जवळपास एक लाख महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी ऑरीक सिटीचे उद्धाटन केले.

ऑरीक सिटी प्रकल्पामुळे अनेकांना रोजगाराची संधी

हेही वाचा - 2022 पर्यंत देशातील गरिबांना पक्की घरे देणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, हरिभाऊ बागडे, दादा भुसे, अतुल सावे, एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, धुरात जीवन घालणाऱ्या बहिणींना मुक्त करण्यासाठी उज्वला योजना राबवण्यात आली. यामध्ये पाच कोटी गॅस वितरित करण्याचे उद्दिष्ठ होते. त्यानंतर ते आठ कोटी झाले. परंतु, मला आनंद आहे की, सरकारने 100 दिवसाच्या आत उद्दिष्ठ पूर्ण केले. तसेच येणाऱ्या पाच वर्षात साडेतीन लाख कोटी रुपये पाण्याच्या अभियानात खर्च केले जाणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details