सिल्लोड (औरंगाबाद) : सिल्लोड तालुक्यातील भराडी महामार्गावर पीकअप गाडी उसाच्या ट्रकला ( Aurangabad Sillod PickUp Tractor Accident ) धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की, सिल्लोड तालुक्यातील भराडी महामार्गावर मोढा फाटा, भराडी रोड या ठिकाणी ऊस असलेले ट्रॅक्टर रस्त्याचे कडेला नादुरुस्त अवस्थेत उभे होते. मध्यरात्री 2 च्या सुमारास लेलँड छोटा पीकअप ( MH 20 CT 2981 ) प्रवासी घेऊन जात असताना या ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकले. हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.