औरंगाबाद -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पेट्रोल भरताना लसीकरण अनिवार्य केले असल्याने पंप चालकांनी गुरुवारपासून सकाळी 8 ते रात्री 7 या काळातच पेट्रोलपंप सुरू ठेवत प्रशासनाविरोधात पंप चालकांनी गांधीगिरी आंदोलन केल्याचे दिसून येत आहे.
आदेश न मानणाऱ्या पंपांवर कारवाई
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (aurangabad collector Sunil Chavan) यांनी लसीकरण प्रमाणपत्र (Vaccination certificate) नसेल तर पेट्रोल देऊ नका, असे आदेश दिले. आदेश न मानणाऱ्या पंपांवर (Petrol Pump) कारवाई केली. आता ग्राहकांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासणी करण्यासाठी मनुष्यबळ लागणार असल्याने पंप चालकांनी कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवारपासून सकाळी आठ ते रात्री सातपर्यंत ग्राहकांना पेट्रोल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पेट्रोल पंप चालक संघटनेचे सचिव अखिल अब्बास यांनी दिली आहे.
असे दिले जात आहे पेट्रोल
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पेट्रोल भरताना लसीकरण प्रमाणपत्र तपासण्याचे आदेश दिल्याने, पंपावर कुपनपद्धत सुरू केली आहे. पंपावर कर्मचारी आधी लसीकरण प्रमाणपत्र तपासणी करत आहेत. प्रमाणपत्र दाखवल्यावर त्यांना एक कुपन दिले जात आहे. ते कुपन दाखवल्यावरच ग्राहकांना पेट्रोल दिले जाते.