औरंगाबाद - गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कमी प्रमाणात येत आहे. जवळपास 20 टक्क्यांनी पुरवठा कमी करण्यात आला आहे. या बाबत पेट्रोलियम कंपन्या स्पष्ट उत्तर देत नसून अनेक नियम त्यांनी बदलले आहेत. ज्यामुळे पेट्रोल डीलर यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या ( Petrol and diesel price hike ) दरात वाढ न झाल्यास राज्यात इंधनाचा कृत्रिम तुटवडा निर्माण ( Fuel shortage in maharashtra ) होण्याची शक्यता पेट्रोल डीलर असोसिएशन तर्फे वर्तवण्यात आली आहे. सर्वच ठिकाणी इंधन पुरवठा कमी करण्यात आला असून यामुळे नागरिकांना त्रासाला समोर जावे लागेल, असे मत औरंगाबाद पेट्रोल डिझेल असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास ( Secretary of Petrol Diesel Association Akhil Abbas ) यांनी वर्तवली आहे.
पुरवठा झाला कमी :शहराला रोज जवळपास 3 लाख लिटर पेट्रोल तर दीड लाख लिटर डिझेलची गरज भासते आणि ग्रामीण भागातील पुरवठा वेगळा आहे. रोज येणाऱ्या गाड्यांची संख्या कमी झाली आहे. इंधन घेताना त्याचे पैसे गाडी भरल्यावर द्यावे लागत होते. तर काही ठिकाणी एक किंवा दोन दिवसांची मुदत दिली जायची मात्र अचानक आता आधी पैसे नंतर इंधनाची गाडी भरेल, असा नियम लावण्यात आला आहे. इंधन पुरवठा परवडत नसल्याने पुरवठा कमी करून होणारा नुकसान कमी केले जात असल्याची माहिती औरंगाबाद पेट्रोल डिझेल असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी दिली.