औरंगाबाद - न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या संदर्भातील याचिका 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. यावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. पुढील सुनावणीच्या वेळेस निकाल जाहीर केला जाईल आणि निश्चितपणे हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग होईल, असा विश्वास याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षण याचिकांवरील युक्तिवाद संपला, याचिकाकर्त्यांना न्याय मिळण्याचा विश्वास - औरंगाबाद विनोद पाटील न्यूज
'न्यायालयाने 'रिझर्व्ह फॉर ऑर्डर' केले आहे, म्हणजे याबाबत युक्तिवाद संपला आहे आणि आता यावर लवकरच न्यायालय निकाल देईल. आमची अपेक्षा आहे की मराठा आरक्षण सुनावणी 5 न्यायाधीशांकडे वर्ग होईल,' असे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटले आहे.
![मराठा आरक्षण याचिकांवरील युक्तिवाद संपला, याचिकाकर्त्यांना न्याय मिळण्याचा विश्वास विनोद पाटील, मराठा आरक्षण याचिकाकर्ते](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8667416-959-8667416-1599140249145.jpg)
'न्यायालयाने 'रिझर्व्ह फॉर ऑर्डर' केले आहे, म्हणजे याबाबत युक्तिवाद संपला आहे आणि आता यावर लवकरच न्यायालय निकाल देईल. आमची अपेक्षा आहे की मराठा आरक्षण सुनावणी 5 न्यायाधीशांकडे वर्ग होईल,' असे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटले आहे.
'सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण याचिकेवर युक्तिवाद झाला, विरोधकांनी अनेक चुकीचे दाखले दिले, आरक्षणाची गरज नाही, असा युक्तिवादही केला. मात्र, आम्ही आमची बाजू मांडली, 85 टक्के समाज मागासलेला आहे, हे आम्ही मांडले. हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे पाठवावे, अशी मागणी करण्यात आली. एकंदरित आज सुनावणीमध्ये मराठा समाजाच्या परिस्थितीवर चर्चा झाली. आरोप-प्रत्यारोप झाले. न्यायालयाने सर्वांचे ऐकून घेतले असून आता निकालाची वेळ झाली आहे,' असे सांगितल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले.
इतर आरक्षण याचिकांवर सुरू असलेल्या सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठसमोर सुनावणीसाठी आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण याचिकेला वेगळा न्याय होऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला मराठा आरक्षण याचिका आता पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठसमोर सुनावणीसाठी घेतली जाईल, असा विश्वास असल्याचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले.