महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पेट्रोल दरवाढीने वाहनधारकांच्या खिशाला लागणार 'आग'; अर्थसंकल्पावर वाहनधारक, सुवर्णकार नाराज - सरकार

अर्थसंकल्पात पेट्रोल आणि सोने महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला झळ बसणार आहे. औरंगाबादेतील वाहनधारकांनी आणि सराफा व्यापाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करताना वाहनधारक

By

Published : Jul 5, 2019, 5:19 PM IST

औरंगाबाद- संसदेत आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि सोने महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला झळ बसणार आहे. तर सराफा व्यापाऱ्यांनाही कस्टम ड्युटीचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य वाहनधारक आणि सुवर्णकारांनी नाराजी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करताना वाहनधारक आणि सराफा व्यापारी


आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये पट्रोल आणि डिझेलसह सोन्याच्या किमती वाढण्याचे संकेत देण्यात आले. यावर सर्वसामान्य औरंगाबादकरांना या सरकारकडून आता अपेक्षा राहिल्या नाही अशा प्रतिक्रिया वाहन चालकांनी दिल्या. तर पट्रोलचे भाव स्थिर ठेवले पाहिजे होते. वाटल्यास वेगळे अनुदान पेट्रोलसाठी देण्यात यावे, असे मतही वानधारकांनी व्यक्त केले. तर सुवर्णकारांनी या निर्णयाचा निषेध करीत आधीच जीएसटीमुळे आमची कंबर मोडली आहे. या बजेटमध्ये आमचा अपेक्षाभंग झाल्याची प्रतिक्रिया सराफा व्यावसायिकांनी दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details