औरंगाबाद - मी पक्षावर नाराज असल्याच बोलले जात आहे. मात्र हा पक्ष माझ्या बापाचा आहे. त्याचा माज नाही तर मला प्रेम आहे. त्यामुळे पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी औरंगाबादमध्ये दिले. शहरात आयोजित पदवीधर मतदरासंघाचे उमेदवार बोराळकराच्या प्रचारसभेदरम्यान त्या बोलत होत्या.
पक्ष माझ्या बापाचा... मला माज नाही तर प्रेम आहे,-पंकजा मुंडे पदवीधर मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून पंकजा मुंडे नाराज आहेत, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या. त्याला पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला. 'आज जास्त बोलायचं नव्हते, मात्र अनेकांना मी काय बोलणार याची उत्सुकता होती. त्यामुळे मला बोलावं लागत आहे. मी आले नसते तर पुन्हा चर्चा रंगतील, त्यामुळे मी विमानात जागा नसताना एकाचे तिकीट कापून बोराळकरांच्या प्रचारासाठी आले, असल्याचे म्हणत पंकजा मुंडे यांनी उमदेवारीच्या चर्चांवरून टोला लगावला.
बोराळकरांना आधीच कल्पना दिली होती-
पदवीधर मतदारसंघात उमेदवारी देत असताना, काही नाव सुचवावी लागतात. त्यावेळी शिरीष बोराळकर यांना बोलवून त्याचे नाव मी सुचवू शकत नाही, मात्र त्यांना पक्षाने उमेदवारी दिली तर आपण नक्की प्रचार करू, अस सांगितले असल्याच पंकजा मुंडे यांनी आपल्या जाहीर भाषणात सांगितले.
भाजपाचा मतदारसंघ पुन्हा खेचून आणू-
मराठवाडा पदवीधर मतदार संघात 12 वर्षांपूर्वी भाजपाचे वर्चस्व होते. आता पुन्हा आपण आपला मतदारसंघ खेचून आणू, सर्वांनी एकत्र येत अधिकृत उमेदवाराचा प्रचार करा. नाराज आणि बंडखोर उमेदवारांशी बोलून त्यांना उमेदवारी मागे घेण्याची विंनती करू, त्यांची समजूत काढू असेही पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.