महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्री संवेदनशील.. त्यांच्या विरोधात नाही, तर लक्ष वेधण्यासाठीच हे उपोषण - पंकजा मुंडे - pankaja munde fasting aurangabad

मराठवाड्याचे पाणी आणि इतर प्रश्नावर मराठवाड्यात कॅबिनेटची बैठक घेण्याची आपण सरकारला विनंती करणार. तसेच सरकारच्या विरोधात एक अवाक्षरही काढले नाही आणि काढणार नाही. फक्त प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण केले असल्याचे पंकजा मुंडेंनी म्हटले.

pankaja munde-uddhav thackeray
पंकजा मुंडे-उद्धव ठाकरे

By

Published : Jan 27, 2020, 5:04 PM IST

Updated : Jan 27, 2020, 7:29 PM IST

औरंगाबाद - मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आपण भेट घेणार आहोत. मराठवाड्याचे पाणी आणि इतर प्रश्नावर मराठवाड्यात कॅबिनेटची बैठक घेण्याची विनंती करणार आहेत. तसेच या सरकारच्याविरोधात एक अवाक्षरही काढले नाही आणि काढणार नाही. फक्त मराठवाड्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आपण हे उपोषण केले असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडे यांनी उपोषण सोडण्यापूर्वी दिलेली प्रतिक्रिया...

काय म्हटल्या पंकजा मुंडे ?

आपण कधीही भाजप सोडणार नाही. माझ्या पक्षांतराच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. भाजपमध्ये राहुनच मी काम करणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले. तसेच यापुढे समाजसेवक म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा... पंकजा मुंडेंचे लाक्षणिक उपोषण; मराठवाड्याच्या हक्काचं पाणी पश्चिम महाराष्ट्राकडे वळवलं - फडणवीस

सध्या राज्यात असलेल्या सरकारला आपल्या मनापासून शुभेच्छा आहेत. त्यांनी आमच्यापेक्षा चांगले काम करावे. या सरकारकडून खुप अपेक्षा आहेत, असेही मुंडे यांनी म्हटले.

सरकारने कर्जमाफी, कर्जमुक्तीपेक्षा पाणी द्यावे. मराठवाड्यातील तरूणांना रोजगार मिळावा. तिथे पाणी नाही त्यामुळे अनेक उद्योग बंद होत आहेत. आजचे उपोषण हे सरकार विरोधात नाही. तर सरकारचे मराठवाड्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषण असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले. या उपोषणाची सरकारने जर दखल घेतली नाही तर मात्र वेगळा विचार करावा लागेल, असेही पंकजा यावेळी म्हणाल्या.

हेही वाचा... 'हिंदूहृदयसम्राट' नावाचे फलक काढण्याचे राज ठाकरेंचे आदेश; अवघ्या ५ मिनिटात आटोपली बैठक

हे सरकार वेगळे...

राज्यातील आताचे सरकार वेगळे आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून लोकांना अपेक्षा आहे. आपण स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. ते संवेदशनशील व्यक्ती आहेत. आमच्या मागण्या ते मान्य करतील आणि मराठवाड्यासाठी काम करतील. त्यांचीही तशी इच्छाशक्ती असल्याचे पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितले.

कृष्णा नदीचे पाणी मराठवाड्याला मिळाले पाहीजे. सिंचनाचा जो अनुषेश बाकी आहे, तो भरून काढला पाहीजे. आमचे सरकार असताना ३२ हजार कोटी दिले. तसेच आताही मराठवाड्यात एक कॅबिनेट बैठक घ्यावी. त्यामुळे मराठवाड्याबाबत निर्णय होवू शकेल. आताच्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कॅबिनेटची बैठक मराठवाड्यात घ्यावी. यासाठी सरकारमधील सर्व पक्षांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंकजा यांनी यावेळी केले.

हेही वाचा... 'दिल्लीत भाजपचा पराभव होणारच'

हे आंदोलन सरकार विरोधात नाही, तर मराठवाड्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी - मुंडे

आजचे आंदोलन हे मराठवाड्यातील गरीब, मजूर शेतकऱ्यांसाठीचे आंदोलन आहे. मराठवाड्यात अनेक अडचणी आहेत. माझा पराभव झाला तरी ते विसरून जायचे आहे. मला मंत्रीपदाचे आकर्षण नाही. माझी संपत्ती जनता आहे. सरकारमध्ये असताना आपण मराठवाड्यासाठी अनेक कामे केली. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, ते संवेदनशील आहेत. तेव्हा चांगलाच निर्णय घेतील, असे पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटले. तसेच वेळ पडली तर आपण आमरण उपोषणही करणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Last Updated : Jan 27, 2020, 7:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details