महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'आमच्या हक्काचं पाणी द्या'; मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर पंकजा मुंडे आक्रमक - पंकजा मुंडे लाक्षणिक उपोषण

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आहेत. यासाठी त्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे.

pankaja munde agitates in aurangabad
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आहेत.

By

Published : Jan 27, 2020, 3:10 PM IST

Updated : Jan 27, 2020, 3:19 PM IST

औरंगाबाद- मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषण सरकारच्या विरोधात नसून मराठवाड्यातील मागण्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आहेत.

पिण्याचे पाणी तसेच सिंचन प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण पुकारल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी सरकारवर टिका करणार नसल्याचे सांगितले. भाजप सरकारने केलेल्या कामांना नवीन सरकारने गती द्यावी, यासाठी हे उपोषण असल्याचे त्यांनी म्हटले. मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

लाक्षणिक उपोषणातील मागण्या

मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे. सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी अतिरिक्त एक हजार कोटी रुपये द्यावे

जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवून महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटरग्रीड योजना तातडीने सुरू करावी. यामार्फत 11धरणे लूप पद्धतीने जोडावी.

पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. त्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी.

जायकवाडी धरणात पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी उपलब्ध करून कालव्याद्वारे सिंधफणा व वाण उपखोऱ्यामध्ये सोडावे. तसेच कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करावा.

फडणवीस सरकारने मंजूर केलेली औरंगाबाद शहराची 1,680 कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करावी व बीड जिल्ह्याचा आरक्षित पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडवावा.

Last Updated : Jan 27, 2020, 3:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details