महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबाद शहरात जमावबंदीचे आदेश, पाचपेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यावर बंदी; विसर्जन मिरवणूक नाही - Ganpati Utsav Aurangabad

शहरात गणरायाच्या आगमनाची मिरवणूक काढण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे विर्सजनाचीही मिरवणूक काढली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे श्रींचे विसर्जन मिरवणुकीशिवाय होणार आहे.

Aurangabad Police
औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश

By

Published : Sep 12, 2021, 8:47 AM IST

औरंगाबाद- शहरात गणेशोत्सवाच्या काळात पाच पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येणे आणि फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन १० ते १९ सप्टेंबरदरम्यान शहरात १४४ कलम लागू केल्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी जारी केले आहेत.

पोलीस आयुक्तांनी काढलेल्या जमावबंदी आदेशानुसार भाविकांसाठी सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध आहे. श्रीगणेशाचे केवळ ऑनलाईन दर्शन उपलब्ध करून द्यावे, असे आदेश मंडळांना दिले आहेत. तसेच, पदाधिकारी किंवा इतरांनी गणेश मंडप, परिसरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त संख्येने जमू नये. आरती करतांना सामाजिक अंतर राखावे. कोविडच्या नियमांच्या सर्व उपाययोजना कराव्यात. कोणत्याही ज्वालाग्रही पदार्थांने आगीचा लोळ निर्माण करण्यास, हवेत सोडण्यास मनाई केल्याचे आदेशात म्हटले आहे. याशिवाय शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात जमावबंदी, सर्व धर्माची प्रार्थना स्थळे बंद ठेवण्यासह संचारास मनाई करणारे कलम १४४ लागू केले आहेत.

विसर्जन मिरवणूक नाही
शहरात गणरायाच्या आगमनाची मिरवणूक काढण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे विर्सजनाचीही मिरवणूक काढली जाणार नाही, असे या आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे श्रींचे विसर्जन मिरवणुकीशिवाय होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details