महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबाद: गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून इंधन दरवाढीचा विरोध - Aurangabad marathi news

औरंगाबाद शहरात एमआयएमने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून अनोखे आंदोलन केले.

आंदोलन
आंदोलन

By

Published : Feb 4, 2021, 10:00 PM IST

औरंगाबाद - गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाल्याने सामान्य माणसाचे जगणे अवघड झाले आहे. दरवाढीमुळे महागाई वाढत असल्याने गृहिणींचे घरातले आर्थिक गणित कोलमडले आहे. गॅस आणि इंधनाची दरवाढ मागे घ्यावी यासाठी औरंगाबाद शहरात एमआयएमने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून अनोखे आंदोलन केले.

शारेक नक्शबंदी
पेट्रोल दर वाढ विरोधी घोषणाबाजी-

पेट्रोलचे दर जवळपास शंभर रुपये झाल्याने वाहनधारकांमध्ये रोष आहे. "अक्कड बक्कड बमबे बो 80..90..पुरे सौ", अशा घोषणेने परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. आंदोलनात मोदी सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी रिकाम्या गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले.

दोन तास केले आंदोलन-

एमआयएमच्या कार्यकर्त्यानी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात दोन ते चार वाजेपर्यंत आंदोलन केले. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. त्यानंतर आपल्या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त यांना शिष्टमंडळाने सादर केले. लवकर इंधन व गँस सिलेंडरचे दर केंद्र सरकारने कमी केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, जिल्हाध्यक्ष समीर साजिद, नासेर सिद्दीकी, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, शेख अहेमद, फेरोज खान, आरेफ हुसेनी, विकास एडके, हाजी इसाक खान, अबुल हसन हाश्मी, रफत यारखान, अब्दुल अजीम, रफीक पालोदकर, राजु पठाण, वाजेद जागिरदार, अब्दुल अजीम इन्कलाब, शेख नदीम, जिशान देशमुख, आसेफ पटेल, शेख शाएब, डॉ. मोईन, शेख आवेज, शेख सलमान, सय्यद निसार कादरी, सलीम पटेल बोरगावकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा-राज्याच्या राज्यपालपदी बसलेला माणूस विक्षिप्त - यशोमती ठाकूर

ABOUT THE AUTHOR

...view details