महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मायबाप सरकार मंदिरं उघडा...कोरोनामुळे वारकरी संप्रदायावर उपासमारीची वेळ - auranagabad news

दारूची दुकान उघडण्यापेक्षा मंदिरे उघडली असती, तर मंदिरावर आधारित असलेले व्यवसाय सुरू झाले असते. मात्र, तसे होत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे मंदिरे उघडा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी सेनेचे सचिव योगेश माऊली सुरळकर यांनी केली आहे.

tempal
मंदिर

By

Published : Aug 17, 2020, 8:55 PM IST

Updated : Aug 17, 2020, 9:39 PM IST

औरंगाबाद - दारूची दुकान उघडण्यापेक्षा मंदिरं उघडली असती, तर मंदिरावर आधारित असलेले व्यवसाय सुरू झाले असते. मात्र, तसे होत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे मंदिरं उघडा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी सेनेचे सचिव योगेश माऊली सुरळकर यांनी केली आहे.

राज्यात सर्व धार्मिक स्थळ बंद असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जातो. मात्र, आजही काही धार्मिक स्थळांवर सकाळी चारपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत भोंग्यांचे आवाज ऐकू येत आहेत. त्यामुळे सरकार कुठेतरी जातींमध्ये फरक करत असल्याचा आरोप योगेश माऊली सुरळकर यांनी केला आहे. राज्यात कोरोनाचे संकट आहे. तर, नियम हे सर्वांना सारखेच लावायला हवेत असेही त्यांनी सांगितले आहे.

राष्ट्रीय वारकरी सेना सचिव योगेश माऊली सुरळकर यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा -राज्यभरात मुसळधार; अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्व प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मार्च महिन्यापासून राज्यातील बहुतेक सर्वच देवस्थाने बंद ठेवण्यात आली आहेत. या काळामध्ये देवस्थानावर अवलंबून असलेल्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. यात विशेषतः मंदिराबाहेर हार, फुले किंवा पूजेचे सामान विकणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात सरकारने दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली, त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली असल्याचे योगेश सुरळकर यांनी म्हटले आहे.

ही दारूची दुकाने उघडण्याऐवजी जर मंदिरे उघडली असती, तर त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांच्या प्रपंचाला आधार मिळाला असता. मात्र, सरकारने तसे केले नाही. दुसरीकडे राज्यातील सर्वच धार्मिक स्थळ बंद ठेवली असल्याचा असा दावा राज्य सरकारकडून केला जातोय. मात्र काही धार्मिक स्थळांवर सकाळी पाच वाजेपासून अभंगांचे आवाज ऐकायला सुरुवात व्हायची, जी सर्वच बंद आहे. मात्र, भोग्यांच्या आवाज का येत आहे? असे सांगत सुरळकर यांनी धार्मिक स्थळे बंद तर काही ठिकाणी भोंगे सुरू म्हणजे राज्यसरकार भेदभाव करत आहे का? असा आरोप योगेश सुरळकर यांनी केला आहे.

Last Updated : Aug 17, 2020, 9:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details