कला शिक्षकाचे एक रूपयाच्या नाण्यावर डॉ. आंबेडकर यांचे रंगीत व्यक्तिचित्र काढून अभिवादन - औरंगाबाद एक रूपयाच्या नाण्यावर डॉ. आंबेडकर यांचे रंगीत व्यक्तिचित्र
या प्रयोगाची 'इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथातील मार्गदर्शक तत्वे भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेच्या वेळेस खूप जास्त मर्गदर्शक ठरलेत. वर्तमानात आणि भविष्यात देखील अर्थकारणात द प्रॉब्लेम ऑफ रुपी मधील मूल्य हे मार्गदर्शक ठरणार आहेत. म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक रूपयाच्या नाण्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रंगीत व्यक्तिचित्र रेखाटून त्यांना आगळ्या- वेगळ्या कलात्मक पद्धतीने अभिवादन केले अशी माहिती राजेश निंबेकर यांनी दिली.
कला शिक्षकाचे एक रूपयाच्या नाण्यावर डॉ. आंबेडकर यांचे रंगीत व्यक्तिचित्र काढून अभिवादन
औरंगाबाद -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती जिल्ह्यातील वेग-वेगळ्या गावात वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन करुन साजरी करण्यात येत आहे. श्री शंकरसिंग नाईक हायस्कूल येथील कलाशिक्षक राजेश निंबेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने एक रूपयाच्या नाण्यावर डॉ. आंबेडकर यांचे रंगीत व्यक्तिचित्र रेखाटून त्यांना कलात्मक अभिवादन केले.
Last Updated : May 4, 2022, 7:44 PM IST