महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Old Woman Suicide : अध्यात्माची आवड असलेल्या आजीने स्वतःला पेटवून केली आत्महत्या - आजीने पेटवून केली आत्महत्या

अध्यात्मिक अभ्यास असलेल्या कावेरी भोसले ह्या आजीने एकादशीला मृत्यू यावा अशी भावना अनेकदा बोलून दाखवली. रविवारी रात्री १० च्या सुमारास त्यांनी हरिपाठ म्हटला. कुटुंबियांना आता तुम्ही झोपा असे सांगत वरच्या मजल्यावर गेल्या. त्यानंतर त्यांनी स्वतःचा अंगाला गावरान तूप लावले. बाथरूममध्ये जात देवाचा धावा करीत स्वतःला पेटवून घेतले.

आजी आत्महत्या
आजी आत्महत्या

By

Published : Jul 25, 2022, 8:36 PM IST

औरंगाबाद -अध्यात्माची प्रचंड आवड असलेल्या ८० वर्षाच्या आजीने अंगाला तूप लावून पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा शिवाजीनगर परिसरात घडली. कावेरी भास्कर भोसले (८०) असे आत्महत्या केलेल्या आजीचे नाव आहे. अध्यात्मिक अभ्यास असलेल्या कावेरी भोसले ह्या आजीने एकादशीला मृत्यू यावा अशी भावना अनेकदा बोलून दाखवली. रविवारी रात्री १० च्या सुमारास त्यांनी हरिपाठ म्हटला. कुटुंबियांना आता तुम्ही झोपा असे सांगत वरच्या मजल्यावर गेल्या. त्यानंतर त्यांनी स्वतःचा अंगाला गावरान तूप लावले. बाथरूममध्ये जात देवाचा धावा करीत स्वतःला पेटवून घेतले.

ओरडण्याचा आवाज आल्यावर मुलगा तसेच सुनेने वरच्या मजल्यावर धाव घेतली. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज (सोमवारी) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.



आजारपणाला कंटाळल्या होत्या आजी :कावेरी भोसले यांना आध्यात्माची अतिशय आवड होती. त्यांचा मुलगा भाऊसाहेब भोसले हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीला आहेत. आजीला हृदयाचा त्रास होता, तसेच दम्यावरही उपचार सुरू होते. दिवसभर त्या हरिपाठ, भजन, पारायण पोथी वाचन यात रमत असत. रविवारीही त्यांनी नित्य नेमाने हरिपाठ केला. भजन केले अन वरच्या रूममध्ये झोपायला गेल्या होत्या, त्यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांवर दुःखच डोंगर कोसळला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा -Accused arrested : आईची हत्या करून फरार झालेला आरोपी अखेर गजाआड

ABOUT THE AUTHOR

...view details