औरंगाबाद- राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घाटी रुग्णालयातील परिचारिका दोन दिवसांच्या ( Nurses strike in Ghati hospital ) संपावर गेल्या आहेत. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. राज्य सरकारने मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा बेमुदत संपावर जाऊ असा इशारा यावेळी संपकरी परिचारिकांनी दिला आहे.
राज्यभरात राज्य सरकार कर्मचार्यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी ( gov employees strike for demands ) आजपासून संपाला सुरुवात झाली आहे. या संपामध्ये विविध कर्मचाऱ्यांच्या संघटना सहभागी झाल्या आहेत. घाटी रुग्णालयातील शासकीय परिचारिका कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. राज्य सरकार मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे.
हेही वाचा-Kirit Somaiya On Nawab Malik ED : शरद पवारांनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा - किरीट सोमैया
रुग्णालयातील सर्व परिचारिका संपात सहभागी
दोन दिवसाच्या संपात राज्य सरकारने मागण्या मान्य न केल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारादेखील यावेळी परिचारिका संघटनेच्या पदाधिकारी इंदुमती थोरात ( Indumati Thorat on nurses strike ) यांनी दिला. घाटी रुग्णालयातील सर्व परिचारिका सहभागी झाल्याचे ( Nurses strike in Ghati hospital ) त्यांनी यावेळी सांगितले.