People's Reaction On Covid 3rd Wave : यापुढे लॉकडाऊन नको, औरंगाबादकर म्हणतात आता पर्याय शोधा - Omicron In India
कोरोनाची तिसरी लाट (Covid 3rd Wave) येण्याचा धोका असताना सरकारकडून लॉकडाऊन (Lockdown) लावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, सरकारने यापुढे लॉकडाऊन (No more lockdown) न लावता त्यावर योग्य असा पर्याय शोधण्याची (Find Alternatives) मागणी नागरिकांमधून होत आहे. ईटीव्ही भारतने औरंगाबादेतील (Aurangabad) नागरिकांशी संवाद साधला असता नागरिक बोलत होते.
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी शासनातर्फे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून आता कुठे तरी नागरिकांना दिलासा मिळत आहे. असे असताना कोरोनाचा नवीन व्हॅरिएंट (New Covid 19 Variant) असलेल्या ओमायक्रॉन व्हायरसने (Omicron Virus) नागरिकांना तिसऱ्या लॉकडाऊनची धास्ती लावली आहे. या व्हायरसने देशात शिरकाव केल्याने (Omicron In India) आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागतो की काय, असा प्रश्न सारसमान्यांना पडला आहे. रुग्णसंख्या वाढल्यास सरकारने लॉकडाऊन लावू नये, त्यासाठी दुसरा पर्याय निवडावा, असा सूर सर्वसामान्य जनतेमधून ईटीव्हीशी बोलतांना उमटला.