औरंगाबाद: मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये अतिवृष्टी झाली असली तरी त्याचा परिणाम वीज पुरवठ्यावर झालेला नाही. (power consumption in marathwada). सद्य स्थितीत आठ जिल्ह्यांमध्ये भारनियमन नसल्याचं महावितरणा तर्फे सांगण्यात आले आहे. (No load Shedding In Marathwada).
No load Shedding In Marathwada : मराठवाड्यात भारनियमन नाही; 'हे' आहे त्यामागचे कारण
मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये अतिवृष्टी झाली असली तरी त्याचा परिणाम वीज पुरवठ्यावर झालेला नाही. (power consumption in marathwada). सद्य स्थितीत आठ जिल्ह्यांमध्ये भारनियमन नसल्याचं महावितरणा तर्फे सांगण्यात आले आहे. (No load Shedding In Marathwada).
उन्हाळ्यात वाढते वीजेची मागणी: उन्हाळ्यात गर्मीमुळे विजेची मागणी वाढते. या काळात विजेची उपकरणं मोठ्या प्रमाणात वापरली जातात. त्यामुळे त्या दोन तीन महिन्यांच्या काळात भारनियमन करावे लागते. मात्र पावसाळ्यामध्ये तुलनेने विजेचा वापर कमी असतो, त्यामुळे भारनियमन करण्याची आवश्यकता नाही, असे महावितरण म्हणाले.
तांत्रिक कारणांमुळे होतो वीज पुरवठा खंडित: कधी-कधी पावसाळ्यात अती पावसामुळे झाडाच्या फांद्या कोसळल्याने किंवा जोराने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे विजेच्या तारा तुटतात. किंवा काही अन्य अडचण आल्यास काही काळ वीज पुरवठा खंडित होतो. मात्र घोषित भारनियमन औरंगाबाद विभागात नाही, अशी माहिती महावितरण विभागाने दिली.