औरंगाबाद- शहरावळच्या लाडगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे सात शिक्षक पॉझिटिव्ह ( Ladgaon ZP School teachers corona positive ) आढळले आहेत. 10 वी आणि 12 वीचे वर्ग सुरू होते. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांची चिंता वाढली ( Corona cases in Aurangabad district ) आहे. एकीकडे शाळा सुरू करण्याची तयारी सुरू असताना चिंता वाढवणारी बातमी आहे.
राज्य सरकारने सोमवारपासून शाळा सुरू करणार ( MH gov on school reopen ) असल्याची माहिती दिली. मात्र, दुसरीकडे औरंगाबादच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सात शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे समोर ( Seven ZP teachers corona positive ) आले. त्यामुळे सरकारचा हा निर्णय योग्य आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
लाडसावंगीच्या शाळेत शिक्षक बाधित..
जिल्ह्यातील लाडसावंगी जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळेतील एक शिक्षक आजारी असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. हा अहवाल सोमवारी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये हे शिक्षक बाधित असल्याचे निष्पन्न झाले. काळजी म्हणून इतर शिक्षकांचीदेखील चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल सात शिक्षक बाधित असल्याचे समोर आले. सध्या शाळा बंद असल्या तरी नववी आणि दहावीचे वर्ग मात्र सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.