महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोनाराला बेदम मारहाण करुन लुटले, 5 लाखांचा सोने-चांदीचा ऐवज केला लंपास - अपडेट न्यूज

औरंगाबाद-पुणे महामार्गावरील भेंडाळा फाटा जवळील तिरुमला ऑईलमील जवळ तिघांनी दुचाकीवरून जाणाऱ्या सोनारास जबर मारहाण केली. त्यांच्या जवळील असलेली सोने-चांदी व पैशांची बॅग असा ५ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटला आहे.

crime news
crime news

By

Published : Aug 6, 2021, 7:51 PM IST

गंगापूर(औरंगाबाद) -औरंगाबाद-पुणे महामार्गावरील भेंडाळा फाटा जवळील तिरुमला ऑईलमील जवळ तिघांनी दुचाकीवरून जाणाऱ्या सोनारास जबर मारहाण केली. त्यांच्या जवळील असलेली सोने-चांदी व पैशांची बॅग असा ५ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटला आहे. ही घटना गुरूवारी दि.५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. बॅग लुटीप्रकरणी तिन संशयित आरोपींविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणीत सोनार गंभीर जखमी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून विजयकुमार लक्ष्मण डहाळे (वय ३६ वर्ष रा. नवीन कायगाव ता.गंगापुर) यांचे औरंगाबाद पुणे महामार्गावरील ढोरेगाव येथे सोन्या-चांदीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते कायगाव येथून सकाळी भेंडाळा ढोरगाव येथे दुकानावर गेले होते. दुकानाचे कामकाज आटोपून संध्याकाळी सहा साडेसहाच्या सुमारास दुकानातील सर्व सोन्या-चांदीचे दागिने व पैसे घेऊन त्यांच्या घराकडे जात असताना चोरट्यांनी तिरूमला ऑईल मीलजवळ त्यांना अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. डोक्याला जबर मार लागल्यामुळे ते खाली पडले असता त्यांच्या जवळील ऐवज असलेली बॅग चोरट्यांनी पळविली. यानंतर विजयकुमार डहाळे यांनी रात्री उशिरा गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. सदरील घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी भेट दिली.

हेही वाचा- कोवोव्हॅक्स ऑक्टोबरमध्ये होणार लाँच- अदार पुनावाला

ABOUT THE AUTHOR

...view details