महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

किराडपुरा भागात आढळले नवजात बाळाचे अर्भक

अक्सा मशिदीजवळ राहणारे अय्युब खान युसूफ खान (२४) यांना रात्री दहा वाजेच्या सुमारास घरात असताना गोंधळ ऐकू आला. यावेळी पाण्याच्या बंबाजवळील मोकळ्या मैदानात एका कचराकुंडीजवळ बाळ असल्याचे कळले. दरम्यान अय्युब हे मित्र शेख अयास शेख इलियास व शाहरुख शेख हमीद हे तिथे गेले. त्यांनी महिलांच्या मदतीने या नवजात मुलीला कपड्यात गुंडाळले. यावेळी जिन्सी पोलिसांच्या पथकाने बाळाला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तत्काळ बाळावर उपचार सुरू केले.

अर्भक
अर्भक

By

Published : Oct 27, 2021, 10:31 PM IST

औरंगाबाद -किराडपुऱ्यात मोकाट जनावरांचा वावर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात स्त्री जातीचे एक अर्भक टाकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला बाळ दिसल्याने त्यांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली. दरम्यान बाळाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. दरम्यान उपचार सुरू असताना बाळाचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किराडपुऱ्यातील अक्सा मशिदीजवळ राहणारे अय्युब खान युसूफ खान (२४) यांना रात्री दहा वाजेच्या सुमारास घरात असताना गोंधळ ऐकू आला. यावेळी पाण्याच्या बंबाजवळील मोकळ्या मैदानात एका कचराकुंडीजवळ बाळ असल्याचे कळले. दरम्यान अय्युब हे मित्र शेख अयास शेख इलियास व शाहरुख शेख हमीद हे तिथे गेले. त्यांनी महिलांच्या मदतीने या नवजात मुलीला कपड्यात गुंडाळले. यावेळी जिन्सी पोलिसांच्या पथकाने बाळाला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तत्काळ बाळावर उपचार सुरू केले. मात्र, मध्यरात्रीच उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला. जिन्सी पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक शेख हारुण याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सिडकोतही उघडकीस आली होती घटना

दरम्यान अशीच काहीशी घटना औरंगाबाद शहरातील सिडको एन-६ भागात शनिवारी उघडकीस आली होती. अज्ञात महिलेने एका अर्भकाला उघड्यावर सोडून पळ काढला होता. दरम्यान याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यामध्ये महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी महिलेचा शोध घेण्याचे काम सिडको पोलीस करीत आहे.

हेही वाचा -रणबीर आणि आलियाचे डिसेंबरमध्ये लग्न?

ABOUT THE AUTHOR

...view details